सणसवाडीची स्नेहल हिरे बनली (सी.ए.) सनदी लेखापाल
सणसवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथील स्नेहल अरुण हिरे हिने सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या सीए परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. स्नेहलने अत्यंत मेहनत आणि चिकाटीने हे यश मिळवले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेली स्नेहल ही लहानपणापासून अभ्यासात प्राविण्य मिळवणारी…