सर्व ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत
दि. ५ नोव्हेंबरवढू बुद्रुक (ता. शिरूर)- महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ऍड. अशोक पवार यांनी रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र बलिदान भूमी वढू बुद्रुक येथे नतमस्तक होत पुष्पहार अर्पण करून आपल्या प्रचाराचा प्रारंभ केला. त्यांच्या या भावनिक प्रारंभाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
पंचक्रोषीतील गावांना भेट देत मतदार राजाशी संवाद – अशोक पवार यांनी कोरेगाव भिमा, वढु बुद्रुक, आपटी, वाजेवाडी, पिंपळे जगताप, दरेकरवाडी, धानोरे ,डिंग्रजवाडी, वाडा पुनर्वसन, सणसवाडी, , शिक्रापूर, पिंपळे जगताप, यांसारख्या पंचक्रोषीतील गावांना भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. गावोगाव पवार यांचे पारंपरिक वाद्यात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले. सणसवाडी येथे तर अंगावर रंगबेरंगी पुष्पवृष्टी आणि तुतारी वाजवत ग्रामस्थांनी पवारांची जंगी मिरवणूक काढली, ज्यामध्ये स्थानिकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
ग्रामस्थांचा विजयाचा निर्धार – कोरेगाव भीमा परिसरातील गावांमध्ये पवारांचे जोरदार स्वागत झाले. ग्रामस्थांनी तुतारीच्या गजरात त्यांचा विजयाचा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या या दौऱ्यामुळे परिसरातील मतदारांमध्ये सकारात्मक ऊर्जा पसरली असून, आगामी निवडणुकीत त्यांना भक्कम पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पंचक्रोषीत प्रचाराचा जल्लोष – ॲड.अशोक पवार यांच्या गावभेटींमुळे संपूर्ण पंचक्रोषीत जल्लोषाचे वातावरण असून, कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत, त्यांच्यासाठी विजयाचा मार्ग प्रशस्त करण्याचा निर्धार व्यक्त केला.