शेतात जनावरे शिरल्याचा जाब विचारल्याने ८० वर्षीय शेतकऱ्यावर दगडाने हल्ला करत एक दात पाडला 

Swarajyatimesnews

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा 

कवठे यमाई (ता. शिरूर) येथे शेतात जनावरे शिरल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ८० वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर दगडाने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव काशीबा पोकळे (वय ८०, रा. कवठे यमाई) यांनी फिर्याद दिली आहे. २० मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतात आरोपींची जनावरे शिरली होती. यावेळी जनावरे बाजूला नेऊन बांधण्यास सांगितले असता वाद निर्माण झाला.

यातून आरोपी संजय शिवराम पोकळे याने शिवीगाळ करत जवळील दगड उचलून फिर्यादींच्या कपाळावर, तोंडावर व उजव्या पायाच्या पोटरीवर मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या तोंडातून व कपाळातून रक्तस्त्राव झाला. दरम्यान, आरोपीचा भाऊ सुनिल शिवराम पोकळे हाही घटनास्थळी आला असून त्याने शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या मारहाणीत फिर्यादींचा एक दात पडला असून खालचे तीन दात गंभीररीत्या दुखावले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!