
Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.

महावितरणला पावसाचा फटका; ९२४ वीज खांब पडले
वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर २७ मे – मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे महावितरणच्या बारामती मंडलातील ६ उपकेंद्रांमधील ९२४ वीज खांब जमीनदोस्त झाले. यामध्ये ६५७ लघुदाब व २६७ उच्चदाब खांबांचा समावेश आहे. पावसामुळे बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या तालुक्यांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला होता. बारामती विभागातील लोणी देवकर, भिगवण, सणसर, काळेवाडी आणि केडगाव…

हवेली तहसीलदारांचा धडाकेबाज ‘सर्जिकल स्ट्राइक’; डंपरवाल्यांची पळापळ
फक्त ७ वाहनांकडेच पास! लोणीकंद (ता.हवेली) येथील सुरभी चौकात तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या नेतृत्वाखाली अवैध वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत १६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी फक्त ७ वाहनचालकांकडे वैध वाहतूक पास आढळले. या कारवाईदरम्यान एका वाहनचालकाने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याचे फोटो आणि व्हिडीओ घेत गाडी जप्त केली….

माता रमाईच्या संघर्षमय पैलूंना बार्टी देणार उजाळा
पुणे, २७ मे २०२५ – महापुरुषांच्या यशात त्यांच्या सहचरणींचे योगदान महत्त्वाचे असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनावर “रमाई संशोधन प्रकल्पा”द्वारे बार्टी संस्था प्रकाश टाकणार आहे, अशी माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली. बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था), पुणे येथे रमाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन…

सणसवाडीमध्ये मुसळधार पावसामुळे मयुरी रेसिडेन्सी सोसायटीची भिंत कोसळली
सणसवाडी (ता. शिरूर) – सततच्या जोरदार पावसामुळे सणसवाडी येथील मयुरी रेसिडेन्सी सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. या घटनेमुळे सोसायटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, महसूल विभागाने तातडीने पंचनामा करावा अशी मागणी सोसायटीच्या चेअरमन वंदना दरेकर यांच्यासह रहिवाशांनी केली. या संदर्भात माहिती देताना सोसायटीच्या चेअरमन वंदना पंडित दरेकर यांनी सांगितले की, सणसवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे नागरी वस्ती,…

शिरूरमध्ये बंद घर फोडून ६२ हजारांचे दागिने चोरीला
शिरूर शहरातील गुजरमळा भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २४ मे रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत घडली. माधुरी नारायण तरटे (वय ३५, रा. गुजरमळा, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात…

वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्यावरील पूल गेला वाहून.. घर, गोठ्यामध्ये शिरले पाणी..शेतीचेही नुकसान
सरकारी काम आणि सहा महिने थांब.. जोरदार आला पाऊस गेला पूल (भराव) वाहून.. कोरेगाव भिमा (ता.शिरूर) श्री क्षेत्र वढू बुद्रुक – चौफुला रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून बंद असून येथील ओढ्यावरील (पूल) मुरुमाचा भराव पावसाच्या पाण्यात वाहून शेतकऱ्यांच्या गोठ्यात आणि घरात पाणी शिरले तर वढू बुद्रुक ते चौफुला अशी वाहतूक ठप्प झाली असून याला बांधकाम…

कोरेगाव भीमा येथे क्षणात माकडाच कुटुंब उध्वस्त करणारी शोकांतिका, ती गेली… पिल्लूही गेलं… पण तो अजूनही थांबलेला, कोरड्या डोळ्यातील वेदना हृदयाला भिडणारी..
शब्दात नव्हे तर कृतीत जगणारी, माणुसकी ,प्रेम शिकवणारी अबोल निष्ठावान प्रेमाची हृदयस्पर्शी वेदना कोरेगाव भीमा (ता.शिरूर) आदर्श चौकात एक हृदयस्पर्शी दुर्घटना घडल्याने माणसांचे मन प्रेमाने ओथंबून जाते आणि नकळत डोळे पाणावतात,“ती माकडीण गेली… तिचं छोटंसं पिल्लूही गेलं… पण त्या दोघांच्या मृतदेहाजवळ, अजूनही थांबून आहे एक माकड — न हलणारं, न काही खाणारं, फक्त त्यांच्याकडे पाहणारं….

शिरूरच्या शिंदोडी मातीचोरी प्रकरणी शेतकऱ्यांनी केली तहसीलदारांची तक्रार थेट महसूल मंत्र्यांकडे
शिरूर (ता. शिरूर) – शिरूर तालुक्यातील तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राजे उमाजी नाईक महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत शितोळे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तहसीलदारांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. दौलत शितोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महसूल मंत्र्यांना तहसीलदारांवरील आरोपांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये अवैध धंद्यांना पाठीशी…

धक्कादायक! वाडा पुनर्वसन येथे “दररोज ५०० रुपये देतो, घरामागे एक तास येत जा” म्हणत ४२ वर्षीय इसमाने केला तरुणीचा विनयभंग
पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या… वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) :येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीची छेड काढल्याप्रकरणी ४२ वर्षीय इसमाला शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या प्रकारामुळे तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात तरुणीने फिर्याद दाखल केली असून त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुणी ही आपल्या कुटुंबासह वाडा पुनर्वसन येथे राहते व…

थेऊर फाटा येथे अपघातात माळकऱ्याचा मृत्यू; पिशवीत सापडले 2.40 लाख रुपये
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर थेऊर फाटा येथे बुधवारी (ता. 21) पहाटे एका अनोळखी माळकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. तो रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) हद्दीत बँक ऑफ बडोदा समोर घडली. मृत व्यक्ती लोणी काळभोर परिसरात नागरिकांकडून भिक्षा मागत असल्याचे सांगण्यात येते.घटनास्थळी लोणी काळभोर पोलिस…