फक्त ७ वाहनांकडेच पास!
लोणीकंद (ता.हवेली) येथील सुरभी चौकात तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या नेतृत्वाखाली अवैध वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत १६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी फक्त ७ वाहनचालकांकडे वैध वाहतूक पास आढळले.
या कारवाईदरम्यान एका वाहनचालकाने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याचे फोटो आणि व्हिडीओ घेत गाडी जप्त केली. “नियमभंग करणाऱ्यांना आता माफ नाही,” असा कडक इशारा तहसीलदार कोलते यांनी दिला.
तहसीलदारांच्या कारवाईची माहिती मिळताच अनेक डंपर चालक आणि मालकांनी आपली वाहने लपवून पळ काढला. परिसरात काही काळ शांतता पसरली होती.
प्रशासनाकडून यापुढे अशाच प्रकारे सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले. कोणालाही नियम मोडण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा संदेशही त्यांनी दिला.