सणसवाडी (ता. शिरूर) – सततच्या जोरदार पावसामुळे सणसवाडी येथील मयुरी रेसिडेन्सी सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. या घटनेमुळे सोसायटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, महसूल विभागाने तातडीने पंचनामा करावा अशी मागणी सोसायटीच्या चेअरमन वंदना दरेकर यांच्यासह रहिवाशांनी केली.
या संदर्भात माहिती देताना सोसायटीच्या चेअरमन वंदना पंडित दरेकर यांनी सांगितले की, सणसवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे नागरी वस्ती, रस्ते आणि शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्याच पावसामुळे सोसायटीच्या कंपाऊंडची भिंत कोसळली.
या वेळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन मंगल शेळके, सचिव छाया गादगी, खजिनदार कोमल ढेकळे, संचालक छाया चौरे, विभावरी पाटील, राहुल नांगरे, अशोक खवले, निलेश कदम, बाळासाहेब भोसले आणि युवराज शिंदे उपस्थित होते.
पावसामुळे परिसरातील शेतीचेही मोठे नुकसान झाले असून, महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.