Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.
शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोलीत वॉटर राईड बेतली जीवावर; महिलेच्या मणक्याचे चार तुकडे, अर्धे शरीर निकामी
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा सुटीचा आनंद लुटण्यासाठी सहलीला गेलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या मोराची चिंचोली येथील ‘जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात’ वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी कमी असल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ३७ वर्षीय महिलेच्या पाठीच्या मणक्याचे चार तुकडे झाले आहेत. व्यवस्थापनाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे या महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी…
मुलगी पाहायला गेले अन् नवरी घेऊनच परतले, अनावश्यक खर्चाला फाटा देत देशमुख-कुंदे परिवाराचा आदर्श
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) आजच्या काळात लग्न म्हणजे केवळ दोन जिवांचे मिलन न राहता, तो एक अवाढव्य आर्थिक सोहळा आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन बनले आहे. लाखो रुपयांची उधळण, डीजेचा कर्णकर्कश आवाज, पंचतारांकित जेवणावळी आणि मान-पानाच्या नावाखाली होणारी वरात या सर्वांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. मात्र, या सर्व बडेजावाला फाटा…
देवदर्शन सोहळ्याने वाडे बोल्हाई दुमदुमली! भाविकांच्या मनातील समाधान हाच माझ्यासाठी आशीर्वाद – माजी उपसरपंच सविता श्रीकांत गावडे
भक्ती, सेवा आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम; बाराशे भाविकांनी घेतला ‘दत्त-पांडुरंगाचा’ आशीर्वाद वाडेबोल्हाई (ता. हवेली) : श्रद्धेचा ओलावा, सेवेचे समर्पण आणि गावाबद्दलचा अतोनात जिव्हाळा… याचा प्रत्यय नुकताच वाडेबोलाईकरांना आला. गावाच्या माजी उपसरपंच सविता श्रीकांत गावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर ही तीर्थयात्रा केवळ एक प्रवास न ठरता भक्तीचा सोहळा ठरली. यात्रेहून परतलेल्या भाविकांचे…
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी प्रदिप राजेंद्र मेहकरे यांची नियुक्ती!
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा सणसवाडी(ता.शिरूर) – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मामहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रभारी अजय जी चिकारा, शांभवी शुक्लाजी, नवज्योतसिंग संधूजी (प्रभारी) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदी प्रदिप राजेंद्र मेहकरे यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल सणसवाडी ग्रामस्थांनी…
धक्कादायक! चाकणमध्ये नराधम बापानेच केला १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
पीडितेच्या धाडसामुळे आरोपी जेरबंद स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा चाकण: पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील दावडमळा येथे रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनीच बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरात एकटी…
Breaking News: शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायत कर्मचारी लाच मागताना एसीबीच्या जाळ्यात
शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीचा कर्मचारी भरत पोपट गायकवाड याला लाच मागितल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. स्वतःसाठी आणि ग्रामसेवकासाठी लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यातील तक्रारदार हे कान्हूरमेसाई गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या जागेत काही लोकांनी…
सविता श्रीकांत गावडे यांच्या ‘मोफत देवदर्शन’ यात्रेचे ऐतिहासिक प्रस्थान
भक्ती आणि सेवेच्या माध्यमातून विकासाचा संकल्प; गाणगापूर-अक्कलकोट-तुळजापूर दर्शनासाठी शेकडो भाविक मार्गस्थ! वाडेबोल्हाई (ता. हवेली): वाडेबोल्हाईच्या मातीत भक्ती आणि सेवेचा वारसा अधिक समृद्ध करत, माजी उपसरपंच सविता श्रीकांत गावडे व उद्योजक श्रीकांत गावडे यांच्या वतीने आयोजित ‘तुळजापूर-अक्कलकोट-गाणगापूर’ या भव्य मोफत देवदर्शन यात्रेचे रविवारी अत्यंत भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. वेताळेश्वर क्रिकेट ग्राउंडवरून भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि…
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी प्रमोद क्षीरसागर
प्रशासकीय अनुभव आणि गुन्हे तपासातील नैपुण्यामुळे सोपवली जबाबदारी; जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश पुणे : पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलात महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रमुखपदी पोलीस निरीक्षक प्रमोद अंबादास क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी नुकतेच याबाबतचे आदेश निर्गमित केले. क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा कार्यभार…
मंचरचे उपविभागीय अधिकारी दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई; बांधकाम व्यवसायातून मागितली होती लाच मंचर : जुन्नर-आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) गोविंद पंढरीनाथ शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज रंगेहाथ पकडले. एका बांधकाम प्रकल्पाचा दाखला देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत…
कोरेगाव भिमा येथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
भवाळकर कुटुंबीयांनी जपला रामजन्मोत्सव वारसा कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील भवाळकर कुटुंबीयांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रामनवमी उत्सव यंदाही अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. मागील अनेक वर्षांची परंपरा जपत, भवाळकर कुटुंबीयांनी प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. या सोहळ्याला ग्रामस्थ आणि भाविकांची मोठी उपस्थिती लाभली होती. आकर्षक सजावट आणि मंगलमय वातावरण : रामनवमीनिमित्त…
