शिक्रापूरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

Swarajyatimesnews

आर. एम. मेश्राम यांच्या ‘गुरू’ पुस्तकाचे प्रकाशन,  आदर्श भीम जयंतीने सामाजिक बांधिलकीचे दर्शन,कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांचा गौरव

शिक्रापूर (ता. शिरूर): क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून शिक्रापूर येथे ‘कर्तव्य फाउंडेशन’ आणि ‘तथागत मैत्री संघ’ यांच्या वतीने भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्रिमुर्ती मंगल कार्यालय येथे पार पडलेला हा सोहळा वैचारिक प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक कृतज्ञतेमुळे तालुक्यात आदर्श ठरला आहे.

याप्रसंगी आर. एम. मेश्राम लिखित ‘गुरू’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या व्याख्यानात अनिल नरके यांनी महापुरुषांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता मांडली.

विचारांचा समाज घडणे काळाची गरज: दिपरतन गायकवाड -शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, “केवळ महापुरुषांचे जयघोष करून चालणार नाही, तर त्यांच्या विचारांना मानणारा आणि त्यांचे अनुकरण करणारा सुसंस्कृत समाज घडायला हवा.”

विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने:  वैद्यकीय क्षेत्र:डॉ. जाधव, डॉ. दातखिळे, डॉ. हिवरकर, डॉ. गायकवाड, डॉ. काशिद, डॉ. पवन सोनवणे, डॉ. अजिंक्य तापकीर, डॉ. खडे मॅडम,पत्रकारितेतील आदर्श कामामुळे पत्रकार उदयकांत ब्राम्हणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ग्रंथपाल  संतोष काळे, निलेश जगताप, राजाराम गायकवाड डी. के. गायकवाड यांच्यासह महाराष्ट्र पोलीस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत तरुणांचा विशेष गौरव करण्यात आला.

विविध उपक्रमांना प्रतिसाद – जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच लहान मुलांचे सांस्कृतिक,  कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा यामुळे वातावरणात मोठा उत्साह होता. उपस्थितांसाठी भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

या सोहळ्यासाठी जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब नरके,डॉ. एल. के. कदम, कर्तव्य फाउंडेशनचे संस्थापक तथा आदर्श सरपंच रमेश गडदे, अध्यक्षा मनीषा गडदे,  तथागत मैत्री संघाचे अध्यक्ष मेश्राम सर, समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष खैरे,मयूर करंजे,मोहिनी मांढरे, सुजाता खैरे,रमेश भुजबळ, बबन मांढरे, प्रशांत वाबळे, महेश तारू, महेश शिर्के, रवी झोडपे, मेजर तुकाराम डफळ यांसह कर्तव्य फाउंडेशन व तथागत मैत्री संघाचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!