शाळांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार : विवेक वळसे पाटील

Swarajyatimesnews

शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड 

पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी शिक्रापूर येथील कोयाळी गावठाण आणि वाबळेवाडी शाळेला भेट देऊन तेथील अडचणींची पाहणी केली. शाळांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे, पंचायत समिती सभापती स्वाती घावटे, शिक्रापूरचे प्रशासक रमेशर गडदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, बाळकृष्ण कळमकर, माजी सरपंच हेमंत करंजे, शिरीष जकाते, उपसरपंच प्रकाश वाबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि दोन्ही शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भेटी दरम्यान, कोयाळी गावठाण शाळेच्या वतीने पूजा भुजबळ यांनी तर वाबळेवाडी शाळेच्या वतीने सतीश वाबळे यांनी शाळेसमोर असलेल्या विविध समस्या मान्यवरांसमोर मांडल्या.

याप्रसंगी दोन्ही शाळांच्या वतीने आणि शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने विवेक वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन वळसे पाटील यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!