Swarajyatimesnewa

लोणीकंद येथे 13 एप्रिल रोजी ‘महाराजस्व समाधान शिबीर , महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या हस्ते होणार शुभारंभ

१५ गावांतील नागरिकांना मिळणार दिलासा स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा लोणीकंद (ता. हवेली) सामान्य नागरिकांच्या दैनंदिन महसुली अडचणी आणि प्रलंबित शासकीय कामे मार्गी लावण्यासाठी पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबवण्यात येत आहे. या भव्य शिबिराचा शुभारंभ सोमवार, १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या हस्ते होणार आहे….

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोलीत वॉटर राईड बेतली जीवावर; महिलेच्या मणक्याचे चार तुकडे, अर्धे शरीर निकामी

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  सुटीचा आनंद लुटण्यासाठी सहलीला गेलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या मोराची चिंचोली येथील ‘जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात’ वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी कमी असल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ३७ वर्षीय महिलेच्या पाठीच्या मणक्याचे चार तुकडे झाले आहेत. व्यवस्थापनाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे या महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी…

Read More
Swarajyatimesnews

देवदर्शन सोहळ्याने वाडे बोल्हाई दुमदुमली! भाविकांच्या मनातील समाधान हाच माझ्यासाठी आशीर्वाद – माजी उपसरपंच सविता श्रीकांत गावडे

भक्ती, सेवा आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम; बाराशे भाविकांनी घेतला ‘दत्त-पांडुरंगाचा’ आशीर्वाद वाडेबोल्हाई (ता. हवेली) :  श्रद्धेचा ओलावा, सेवेचे समर्पण आणि गावाबद्दलचा अतोनात जिव्हाळा… याचा प्रत्यय नुकताच वाडेबोलाईकरांना आला. गावाच्या माजी उपसरपंच सविता श्रीकांत गावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर ही तीर्थयात्रा केवळ एक प्रवास न ठरता भक्तीचा सोहळा ठरली. यात्रेहून परतलेल्या भाविकांचे…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! चाकणमध्ये नराधम बापानेच केला १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

पीडितेच्या धाडसामुळे आरोपी जेरबंद स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा चाकण: पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील दावडमळा येथे रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनीच बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरात एकटी…

Read More
Swarajyatimesnews

शिरूरमधील दिव्यांग व्यक्तीला उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, घरावरील पाडकाम कारवाईला स्थगिती

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा   शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील एका शंभर टक्के दिव्यांग (मूकबधिर) व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सरकारी जमिनीवर घर बांधल्याच्या कारणावरून प्रशासनाकडून सुरू असलेल्या पाडकाम कारवाईला न्यायालयाने नुकतीच अंतरिम स्थगिती दिली. या निर्णयामुळे पिंपरखेडमधील तुकाराम दशरथ पवार यांच्या गरीब कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, प्रशासनाच्या कारवाईला तूर्तास ब्रेक लागला आहे. तुकाराम…

Read More
Swarajyatimesnews

Breaking News: शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायत कर्मचारी लाच मागताना एसीबीच्या जाळ्यात

शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीचा कर्मचारी भरत पोपट गायकवाड याला लाच मागितल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. स्वतःसाठी आणि ग्रामसेवकासाठी लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यातील तक्रारदार हे कान्हूरमेसाई गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या जागेत काही लोकांनी…

Read More
Swarajyatimesnews

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी प्रमोद क्षीरसागर

प्रशासकीय अनुभव आणि गुन्हे तपासातील नैपुण्यामुळे सोपवली जबाबदारी; जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश ​पुणे : पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलात महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रमुखपदी पोलीस निरीक्षक प्रमोद अंबादास क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी नुकतेच याबाबतचे आदेश निर्गमित केले. क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा कार्यभार…

Read More
स्वराज्य टाईम्स

वाडे-बोल्हाईत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आणि मान्यवर सन्मान सोहळा उत्साहात संपन्न!

सविता श्रीकांत गावडे व उद्योजक श्रीकांत गावडे यांच्या वतीने ८०० भाविकांना अन्नदान; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव वाडे-बोल्हाई (ता. हवेली): श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून वाडे-बोल्हाई येथे भक्ती आणि कर्तृत्वाचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. श्री स्वामी समर्थ महाराज ट्रस्ट, वाडे-बोल्हाई यांच्या वतीने आणि सविता श्रीकांत गावडे व उद्योजक श्रीकांत गावडे यांच्या विशेष…

Read More
Swarajyatimesnews

सिंहगडावर घुमला स्त्रीशक्तीचा हुंकार, ‘हिरकणी ट्रेक’मध्ये २८९० महिलांचा सहभागी

स्त्रीशक्तीच्या जागरणासाठी आणि आरोग्यासाठी गडकिल्ले मोहिमांचे आयोजन ही काळाची गरज आहे – नगरसेवक ऐश्वर्या पाटील पठारे.” स्वराज टाईम्स वृत्तसेवा  पुणे: ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या जयघोषात आणि अभूतपूर्व उत्साहात किल्ले सिंहगड रविवारी महिलांच्या जिद्दीने न्हाऊन निघाला. सखी प्रेरणा मंच आणि फोर्ट फिट मुव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विशेष हिरकणी ट्रेक’ मोहिमेत २८९० महिलांनी सहभाग नोंदवत स्त्रीशक्तीचे…

Read More
Swarajyatimesmews

 धक्कादायक !  शिरूरच्या मांडवगण फराटा परिसरात दोन गटांत गोळीबार; परस्परविरोधी गुन्हे दाखल

दोन्ही गटांकडून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; बॅनरवरील फोटोवरून वादाचे पर्यावसान संघर्षात शिरूर : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भैरवनाथ स्टेडियम परिसरात गुरुवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवरील फोटो आणि जुन्या वादातून दोन गट समोरासमोर आले असून, दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नाचे (कलम…

Read More
error: Content is protected !!