प्रतिनिधी राजाराम गायकवाड
शिक्रापूर, ता. ४ : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ भाविक लक्ष्मण भाऊसाहेब भुजबळ (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायासह शिक्रापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते चे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक रमेश भुजबळ यांचे वडील, सोमनाथ भुजबळ यांचे वडील तसेच शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वंदना भुजबळ यांचे सासरे होत.
लक्ष्मण भाऊसाहेब भुजबळ हे साधी राहणी, धार्मिक वृत्ती आणि वारकरी संप्रदायावरील निष्ठेसाठी परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, धार्मिक व कौटुंबिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
