
Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.

सणसवाडीत कोसळले अवाढव्य होर्डिंग; सुदैवाने जीवितहानी टळली, वाहतूक ठप्प
सणसवाडी (ता. शिरूर), ता. २० मे : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी मुख्य चौकात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे एक मोठे होर्डिंग कोसळले. सुमारे ३० फूट लांब, ३० फूट रुंद व ३० फूट उंचीचे हे अवाढव्य होर्डिंग महामार्गाच्या दिशेने कोसळले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सुदैवाने, होर्डिंगच्या खाली असलेल्या दुकानांतील नागरिक वेळेवर…

शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेत ३५ वर्षांनी भरला स्नेहमेळावा
शिक्रापूर (ता.शिरूर) : विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर येथील सन १९९०- ९१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या वेळी जुन्या वर्गमित्रांना भेटून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आयुष्यात केलेल्या प्रगती, सुखदुःखाची, आशापयश यांची उजळणी करण्यात आली. या कार्यक्रमास शाळेचे जेष्ठ मार्गदर्शक गुरुजन बांगर सर, साकोरे सर, सूर्यकांत शिर्के सर,…

लोणंद येथे होणार संत ज्ञानेश्वर माऊली व कान्हुराज महाराज यांच्या पालखीचा ‘काका-पुतणे भेट सोहळा’
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – यावर्षीपासून लोणंद (जि. सातारा) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत कान्हुराज पाठक महाराज यांच्या पालख्यांची अधिकृत ‘काका-पुतणे भेट’ होणार असून, हा भक्तिरसात न्हालेला सोहळा येत्या २७ जून रोजी पार पडणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाने वारकरी संप्रदायात आनंदाची लहर उमटली आहे. साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या संजीवन समाधीवेळी खिरापतीचे कीर्तन…

केसनंद येथे लायसन्स नसलेल्या चालकाच्या भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू
चालक मालकावर गुन्हा दाखल केसनंद (ता. हवेली) – लायसन्स नसलेल्या चालकाच्या ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी घडली. मृत व्यक्तीचे नाव रामदास साहेबराव गायकवाड (वय ५२, रा. दौंड) असे आहे. या प्रकरणी मयताचे बंधू यशवंत गायकवाड (वय ४०) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक मालक संतोष आत्माराम…

कोरेगाव भीमा येथील लॉजमध्ये शिक्रापूरच्या तरुणाची आत्महत्या
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका लॉजमध्ये अमोल शिवाजी आढाव (वय २९, रा. २४ वा मैल, शिक्रापूर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १७ मे) सकाळी उघडकीस आली असून आत्महत्येच्या कारणाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.१६ मे) कोरेगाव भीमा येथील हॉटेल जनता लॉजमध्ये थांबलेला होता. शनिवारी सकाळी त्याच्या खोलीचा दरवाजा…

मांडवगण फराटा येथे डंपर-पिकअप अपघात; दोन ठार, एक गंभीर जखमी
मांडवगण फराटा (ता.शिरूर) गावात डंपर आणि पिकअप जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात १७ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला. प्राप्त माहितीनुसार, मांडवगण फराटा येथून वडगाव रासाईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने (MH 42 SEQ 7696) समोरून येणाऱ्या पिकअप जीपला (MH 03 OE 0638)…

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती
पुणे – पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या नेतृत्वात मोठा बदल झाला असून, संदीपसिंग गिल यांनी नवे पोलिस अधीक्षक (SP) म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या कार्यकाळाकडून कायदा-सुव्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार, गिल यांची बदली ५ सप्टेंबर २०२४ रोजीच निश्चित झाली होती. मात्र, तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बदलीविरोधात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात…

विनोदी कीर्तनकार ह. भ. प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन
सोलापूर –ज्येष्ठ कीर्तनकार, समाजप्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे लोकप्रिय प्रचारक ह. भ. प. मधुकर महाराज गिरी (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात आणि कीर्तन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पशा आजारामुळे त्यांना सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकर महाराज गिरी हे सोलापूर…

“दूरदृष्टी, संघर्ष आणि यश” – सरपंच संदीप ढेरंगे यांनी लिहिली कोरेगावच्या जलक्रांतीची नवी गाथा!
कोरेगाव भिमा पाणी योजनेला अखेर चालना, ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – “आमची एकी, आणखी बरेच काम बाकी” या कृतीशील विचाराने प्रेरित होऊन आदर्श सरपंच संदीप ढेरंगे व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी कोरेगाव भिमा गावाच्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर निर्णायक मार्ग काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत वनविभागाची कोट्यावधी…

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूचा मृत्यू
माळशिरस तालुक्यातील बाभूळगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू जानकी बाळासाहेब गळगुंडे (मूळ रा. घोटी, ता. माढा) हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.१३ मे रोजी जानकीचा विवाह समीर हरिदास पराडे (रा. बाभूळगाव) याच्याशी नीरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात थाटामाटात पार पडला होता. विवाहानंतर तिचा…