माळशिरस तालुक्यातील बाभूळगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू जानकी बाळासाहेब गळगुंडे (मूळ रा. घोटी, ता. माढा) हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.१३ मे रोजी जानकीचा विवाह समीर हरिदास पराडे (रा. बाभूळगाव) याच्याशी नीरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात थाटामाटात पार पडला होता. विवाहानंतर तिचा सासरी गृहप्रवेशही झाला.मात्र दुसऱ्याच दिवशी, १४ मे रोजी सकाळी जानकीच्या छातीत अचानक वेदना होऊ लागल्या. तिला तातडीने रुग्णालयात नेले जात असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत हृदयविकाराचा झटका हे कारण नमूद केले आहे.