कोरेगाव भिमा सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब वाडेकर

Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा  (ता. शिरूर) विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायटी कोरेगाव भीमा क्रमांक दोनच्या चेअरमनपदी बाळासाहेब दत्तात्रय वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तत्कालीन चेअरमन महादेव सोपान फडतरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवड झाली. या निवडीमुळे वाडा गावठाण परिसराला इतिहासात पहिल्यांदाच चेअरमन पदाची संधी मिळाली असून, परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने कोरेगाव भीमाच्या सहकार क्षेत्रात मैत्री आणि त्यागाचा एक आगळावेगळा आदर्श समोर आला आहे. ज्येष्ठ संचालक अशोक देवचंद नाबगे यांना चेअरमन पदाची थेट संधी उपलब्ध असताना, त्यांनी आपल्या खास मित्रासाठी स्वतःची संधी बाजूला ठेवली व बाळासाहेब वाडेकर यांच्या नावाचा मार्ग मोकळा केला. त्यांच्या या ‘यारी’ची आणि राजकीय सुसंस्कृतपणाची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

या निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन वाडेकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी सरपंच आबासाहेब लक्ष्मण गव्हाणे, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गव्हाणे,  वसंत गिलबिले, संदीप ढेरंगे आणि माजी चेअरमन मधुकर शामराव गव्हाणे यांनी उपस्थित राहून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी मारुती सावंत, कांताराम कडलक, संतोष बगाटे, विकास कोळेकर, आकाश नाबगे, रामदास नायकुडे, गोविंद वाडेकर, गणेश वाडेकर, संपत माळी, नवनाथ माळी, सुरेश कोकरे, बाळासाहेब सावंत, ज्ञानेश्वर नायकुडे यांच्यासह सोसायटीचे सर्व विद्यमान संचालक, माजी चेअरमन आणि माजी व्हाईस चेअरमन उपस्थित होते.

सदर निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत पिसाळ यांनी पाहिली, तर त्यांना सोसायटीचे सचिव मधुकर कंद यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!