सोलापूर –ज्येष्ठ कीर्तनकार, समाजप्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे लोकप्रिय प्रचारक ह. भ. प. मधुकर महाराज गिरी (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात आणि कीर्तन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पशा आजारामुळे त्यांना सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मधुकर महाराज गिरी हे सोलापूर जिल्ह्यातील नान्नज सोलापूर –ज्येष्ठ कीर्तनकार, समाजप्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे लोकप्रिय प्रचारक ह. भ. प. मधुकर महाराज गिरी (वय ९५) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात आणि कीर्तन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.येथील रहिवासी होते. त्यांनी ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून सेवा बजावत असतानाच कीर्तन साधना अखंडपणे सुरू ठेवली. गंभीर सामाजिक विषय विनोदी शैलीत सादर करण्याची त्यांची खासियत होती. त्यांच्या कीर्तनांमधून धर्म, अध्यात्म आणि सामाजिक प्रबोधनाचा प्रभावी संदेश पोहोचत असे. त्यांच्या प्रभावशाली शैलीने ग्रामीण भागापासून ते शहरी समाजापर्यंत लाखो श्रोत्यांना भुरळ घातली होती.
ते अखेरच्या श्वासापर्यंत कीर्तन व समाजप्रबोधनाची सेवा करत होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पार्थिवावर नान्नज (ता. सोलापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.