
Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.

बीजेएस महाविद्यालयात ‘जे. आयएसएएस परिषद २०२५’ चे यशस्वी आयोजन: संशोधन आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन
पुणे, २ ऑगस्ट २०२५: बीजेएस एएससी कॉलेज, वाघोली येथे आज आयएसएएस मुख्यालय आणि आयएसएएस पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठित ‘जे. आयएसएएस परिषद २०२५’ चे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या परिषदेने संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून वैज्ञानिक विचार आणि सहकार्याला प्रोत्साहन दिले. या परिषदेत १०० हून अधिक उपस्थिती होती, ज्यात ३५ प्रभावी पोस्टर सादरीकरणे…

बी.जे.एस. महाविद्यालयात नागपंचमीनिमित्त ‘सर्प जनजागृती’ कार्यशाळा उत्साहात संपन्न!
वाघोली (ता.हवेली): नागपंचमीच्या पवित्र आणि पारंपरिक दिवशी, अंधश्रद्धांना छेद देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने ‘सापांविषयी जनजागृती’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, IQAC समन्वयक आणि प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. माधुरी देशमुख, तसेच वनस्पतिशास्त्र…

शिक्रापूर येथे शारदा लॉजवर पोलिसांचा छापा,पाच महिलांची सुटका, देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश
सामाजिक कार्यकर्त्या स्वाती गायकवाड व अर्चना केदार यांनी फेसबुक्र लाइव्ह करत शिक्रापूरच्या वैश्या व्यवसायाची पोलखोल, मॅनेजरला अटक शिक्रापूर पोलिसांनी गुरुवारी (३१ जुलै २०२५) रात्री उशिरा येथील शारदा लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत लॉजचा मॅनेजर संतोष सिना पुजारी (वय ३७) याला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी पाच पीडित…

आगामी निवडणुकीत वाडेबोल्हाईला जिल्हा परिषदेची उमेदवारी द्या: माजी सरपंच कुशाभाऊ गावडे
श्रेष्ठींकडे आग्रही मागणीने स्थानिक राजकारणात उत्साहाचे वातावरण पुणे प्रतिनिधी : विजय लोखंडे दि. ३० जुलै २०२५: पूर्व हवेली तालुक्यातील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे वाडेबोल्हाई गाव राजकारणातही उजवे ठरत असून आता जिल्हा परिषदेच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहे. माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते कुशाभाऊ गावडे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत वाडेबोल्हाईला उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली…

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला घडवणारी कार्यशाळा बीजेएस महाविद्यालयात उत्साहात संपन्न!
वाघोली (ता. शिरूर): बीजेएस महाविद्यालयात “कॅपॅसिटी बिल्डिंग अँड सॉफ्ट स्किल्स” समितीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळा प्रेरणादायी वातावरणात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देत मान्यवर मार्गदर्शकांनी अनुभवांचे मौल्यवान मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. रविंद्र सिंग परदेशी म्हणाले, “चार भिंतीतील शाळा हे केवळ ज्ञानदानाचे स्थळ नसून, आयुष्याच्या व्यापक दृष्टीकोनाचा पाया रचणारे स्थान…

धक्कादायक: वाघोलीजवळ बकोरी फाट्यावर ट्रॅव्हल बसवर दरोडा, चालक-वाहक-प्रवाशाला मारहाण करून चौघांनी लुबाडले
भोसरीहून बीडकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसवर वाघोली येथील बकोरी फाट्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. चार दरोडेखोरांनी चालक, वाहक आणि एका प्रवाशाला मारहाण करून रोख रक्कम लुटली. ही धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री पावणेबारा वाजता पुणे-अहमदनगर रस्त्यावरील समृद्धी लॉजिंगसमोर घडली. या प्रकरणी बसचालक भाऊसाहेब युवराज मिसाळ (वय २६, रा. मयुर नायगाव, ता. पाटोदा जि….

गोळीबार एक कंगोरे अनेक! ठेका घुंगराचा, आवाज गोळीबाराचा; भाऊ आमदार मांडेकरांचा अन् बदनाम केला भाऊ आमदार माऊली कटकेंचा
आमदार माऊली कटके यांच्यासह भाऊ अनंता कटके यांच्या बदनामी प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल पुणे, २५ जुलै २०२५: दौंड येथील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबारात भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ बाळासाहेब मांडेकर याचे नाव समोर आल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, या…

वारकरी शांताराम गव्हाणे यांचे दुःखद निधन; आदर्श कुटुंबप्रमुख हरपला
डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील शिरूर-हवेली पंचक्रोशीतील धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा एक आधारस्तंभ, वारकरी संप्रदायाचे निष्ठावान पाईक आणि एकत्र कुटुंबपद्धतीचे मूर्तिमंत आदर्श, कै. शांताराम किसनराव गव्हाणे (वय ६०) यांचे दिनांक १६ जुलै रोज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ गव्हाणे कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण शिरूर परिसरातील धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून,…

धक्कादायक! अंबिका कला केंद्रात झाला गोळीबार, चौघांवर गुन्हा दाखल
पुणे जिह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रात सोमवारी (दि. २१) रात्री उशिरा, अंदाजे ११ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चार व्यक्तींविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दौंडचे उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी दिली. अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब आंधळे यांनी या घटनेबाबत यवत पोलीस…

सातारा हादरलं! एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने शाळकरी मुलीच्या गळ्यावर ठेवला चाकू, थरारक VIDEO व्हायरल
सातारा: एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने सातारा शहरात (Satara City) अक्षरशः दहशत माजवली. एका शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावून त्याने तिला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. हा थरारक व्हिडिओ (Viral Video) सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे केवळ सातारा पोलीस प्रशासनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) हादरला आहे. “महाराष्ट्रात हे नेमकं चाललंय काय? इथे कायद्याची…