
Category: स्थानिक वार्ता

वाडा पुनर्वसन येथे ९६ वर्षांच्या आजीने १४ व्यांदा विधानसभेला केले मतदान
मुलगा व नातू अशा तीन पिढ्यांनी बजावला मतदानाचा हक्क कोरेगाव भीमा – वाडा पुनर्वसन(ता. शिरूर) येथील ९६ वर्षांच्या आजीने व्हील चेअरवर बसून मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क बजावला असून इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले. वृद्ध आजी मतदानाला आल्याचे पाहून मतदारांना आनंद वाटला व मतदान करण्याची प्रेरणा मिळाली.यावेळी ९६ वर्षांच्या आजिसह, मुलगा व नातू यांनी…

वाघोलीकरांचा स्वाभिमान गहाण टाकला नाही, मायमाऊलींचे प्रेम या भूमिपुत्रावर आहे – माऊली कटके
गेली १५ वर्षे मोठ्या भावाप्रमाणे आपण शिरूरला संधी दिली. आता लहान भावाची वेळ आहे. हवेलीला नक्की संधी मिळणार माऊली कटके यांच्या सांगता सभेला अलोट व अभूतपूर्व गर्दी वाघोली (ता. हवेली)”पैशाने वाघोलीकरांना विकत घेता येईल, असा समज करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल. वाघोलीकरांचा स्वाभिमान गहाण टाकला गेलेला नाही, आणि मायमाऊलींचे प्रेम या भूमिपुत्रावर आहे,” असे भावनिक आवाहन…

जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय”, प्रतिभा पवारांच्या हातातील फलकाने बारामतीसह राज्याचं वेधलं लक्ष
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सर्व नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सांगता सभांचं आयोजन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामतीत सभेचं आयोजन केलं आहे.यंदाच्या निवडणुकीतील शरद पवारांची ही सांगता सभा आहे. बारामतीत शरद पवारांच्या पक्षाने सांगता सभेची जोरदार…

‘आजच्या सभेला जमलेली गर्दी बघता,माऊली कटके यांचा विजय आजच निश्चित झालेला आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार
भावकी आज झोपणारच नाही न्हावरे (ता.शिरूर) आजच्या या प्रचार सभेला जमलेली गर्दी बघता माऊली कटके यांचा विजय आजच निश्चित झालेला आहे. याच विजयाच्या जोरावर सद्या बंद असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुढल्या वर्षी सुरु करणार आहे.सद्या उसाचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. आपल्या उसाचे काय होणार? म्हणून शेतकरी वर्ग घाबरलेला आहे. मात्र शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू…

शिरूरमध्ये दादाचा वादा हटके… अजित पवारांचा विश्वास शिरूर विधानसभा जिंकणार माऊली कटके
घोडगंगा सुरू करण्यासह विविध सरकारी योजना, स्थानिकांना रोजगार, कालव्याचे पाणी ,शेतकऱ्यांना दिवसा वीज यांची माहिती देत ऋषीराज पवार यांच्या प्रकरणाचा घेतला खरपूस समाचार न्हावरे (ता. शिरूर) शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सभेने वातावरण तापवले असून लाडकी बहीण योजनेपासून विविध सरकारी योजना, रोजगार यासह विविध विकासाच्या मुद्द्यांसह चासकमान , घोडगंगा कालव्याचे पाणी,शेतकऱ्यांना…

अजितदादा कितीही गुलाबी जॅकेट घाला, गद्दारीचा रंग कसा लपवणार? खासदार अमोल कोल्हें
कोल्हेंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यसरकारवर जोरदार टीका तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) अनेक जण निवडणुकीत विचारायचे तुमच्याकडे काय आहे? ना पक्ष ना चिन्ह कसे निवडून येणार? आम्ही त्यांना सांगायचो, आमच्याकडे शरद पवार आहेत. दुसऱ्या नेत्यांनी अंगावर गुलाबी जॅकेट चढवलंय. त्यांनीही कितीही गुलाबी जॅकेट घातले तरी ते गद्दारीचा रंग कसा लपवणार आहेत? अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस…

वाबळेवाडी ग्रामस्थांकडून ढमढेरे-भुजबळांच्या विरोधात व्यंकटेशचा शेअर्सबॉंब
व्यंकटेशकृपाचे १६ हजार शेतक-यांचे शेअर्स कधी देणार : ढमढेरे-पुजा भुजबळांना वाबळेवाडीकरांचा थेट सवाल वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील पालकांच्या पावत्या दाखवून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे यांनी आमदार अशोक पवारांच्या आडून जो जाहीर प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर त्यांना शासनाच्या चौकशी समितीने कधीच दिले आहे. आता ढमढेरे यांनीच पुढे यावे आणि व्यंकटेश…

श्री छञपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नेत्रदीपक दिपोस्तव मोठ्या उत्साहात साजरा
श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथे आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य दीपोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी भक्तीचा,चैतन्याचा, त्यागाचा,शौर्याचा व बलिदानाचा एक एक दिवा लावण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील अनेक गावातील शंभूभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवप्रतिष्ठान…

शिरूर तालुक्यात उद्या शरद पवार यांची मांडवगण फराटा येथे जाहीर सभा
शिरूर विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ॲड अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची मांडवगण फराटा येथे जाहीर सभा होणार आहे. शिरूर मतदारसंघात गुरुवारी, दि. १४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वडगाव रासाई येथे दुपारी १ वाजता आयोजित या…

स्व.बाबुराव पाचर्णे यांनी मोठा विकास निधी आणला प्रसंगी आमदारकी पणाला लावली पण कधी श्रेय घेतले नाही – प्रदीप कंद
धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून जनतेने ही निवडणूक हाती घेतल्याने विजय निश्चित – माऊली कटके कोरेगाव भिमा (ता.शिरूर) संचालक प्रदीप कंद यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना सोबत घेत कोरेगावला तीन काेटींचा विकासनिधी दिला, तसेच तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी मतदार संघात सुमारे तीन हजार कोटींची विकासकामे मंजुर करुन आणली, प्रसंगी आमदारकी पणाला लावून नगर…