
Category: स्थानिक वार्ता

शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कही खुशी, कही गम!
दिनांक ११ ११ जुलै २०२५: शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत मुख्य तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या सोडतीमुळे अनेक गावांमध्ये खुले पद मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण होते, तर काही गावांमध्ये आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत उमटल्या. पारदर्शकतेने पार पडली सोडत…

सणसवाडीतील वसेवाडी शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची परंपरा कायम
२९ विद्यार्थी चमकले सणसवाडी (ता.शिरूर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी (सणसवाडी) ने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण २९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. इयत्ता…

शिरूरमध्ये किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; एकास अटक
शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कवठे यमाई येथे काल रात्री, ९ जुलै २०२५ रोजी, किरकोळ वादातून एका तरुणावर लोखंडी फायटरने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम गोरक्षनाथ कांदळकर (वय १८) या तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. शिवम काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास…

धक्कादायक! पुण्यात आई वडिलांनी अवघ्या ४० दिवसांच्या चिमुकलीला ३.५ लाखांना विकले
पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांसाठी एका आई-वडिलांनी आपल्या अवघ्या ४० दिवसांच्या मुलीची ३.५ लाख रुपयांना विक्री केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आई-वडिलांची नावे मीनल ओंकार सपकाळ (२९) आणि ओंकार औदुंबर सपकाळ (२९) अशी असून ते दोघेही बिबवेवाडीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Protected: शिक्रापूर येथे प्राचार्य सोनबापू गद्रे व विलास कांबळे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
There is no excerpt because this is a protected post.

५३ वर्षांनंतर कोरेगाव भिमा येथील नरेश्वर तलावाचे खोलीकरण: गावकऱ्यांच्या एकीने साधला ‘तिहेरी विकास’
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे महाराष्ट्रातील सर्वात भीषण ठरलेल्या १९७२ च्या दुष्काळात खोदलेल्या तलावातील गाळ काढण्यासाठी व खोलीकरणासाठी ५३ वर्षांनंतर एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे! “गावच्या सर्वांगीण विकासात एकी, गावच्याप्रति विकास कामात नेकी आणि आणखी बराच विकास बाकी” असा दृढ निश्चय करत कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी नरेश्वर मंदिरामागे असलेल्या जल तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी…

नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले सोमय मुंडे पुण्याचे नवे पोलिस उपआयुक्त
पुणे:राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आणि नक्षलवादी विरोधी कारवायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची पुणे शहर पोलिस दलात उपायुक्त (DCP) म्हणून बदली झाली आहे. लातूरचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांची मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली होती, मात्र अवघ्या एका महिन्यात त्यांची पुन्हा बदली होऊन ते थेट पुणे शहरात…

धक्कादायक! पुण्यातील भोंदूबाबा ‘स्पायवेअर’च्या माध्यमातून भक्तांचे खासगी क्षण रेकॉर्ड करून अश्लील कृत्यांना करायला करत होता प्रवृत्त
पुणे: बावधन पोलिसांनी एका भोंदूबाबाला अटक करून अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला एक अत्यंत धक्कादायक आणि अमानवी सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. हा बाबा भक्तांच्या मोबाईलमध्ये गुपचूप स्पायवेअर ॲप (Spyware App) डाऊनलोड करून त्यांच्या खासगी आयुष्यावर थेट मोबाईल कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवत होता आणि त्यांचे खाजगी क्षण चित्रीत करत होता. प्रसाद उर्फ भीमराव तामदार (वय २९, रा….

अवैध गावठी हातभट्टीवर शिरूर पोलिसांची धडक कारवाई
शिरूर (पुणे): पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अवैध गावठी हातभट्टीचा व्यवसाय तेजीत असताना, शिरूर पोलिसांनी २४ जून २०२५ रोजी एका मोठ्या कारवाईत तब्बल १.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत या व्यवसायाला चांगलाच हादरा दिला आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कण्हेरे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या या गावठी हातभट्टीवर…

दोन वेगवेगळ्या चोरीप्रकरणातील सोन्याचे दागिने मूळ मालकांच्या स्वाधीन
शिरूर पोलिसांचे नागरिकांतून कौतुक! शिरूर (जि. पुणे): शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावला आहे. चोरीस गेलेले सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पुन्हा मूळ मालकांना परत करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व त्यांच्या पथकाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. गुन्हा १: एसटी स्थानकाजवळून गळ्यातील…