चाकण (ता.खेड) कडाचीवाडी येथे सकाळी घरातून खेळण्यासाठी बाहेर गेलेली मुले घरी आली नसल्याने शोधाशोध सुरू करण्यात आली. यावेळी पाझर तलावा जवळ चारही जणांचे कपडे आणि चप्पल आढळून आल्याने चिंता वाढली, स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलावात शोध घेण्यात आला आणि चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चाकण येथील कडाचीवाडी (ता.खेड ) येथील पाझर तलावात मुले पोहायला गेली होती. त्यानंतर ही मुले परतली नसल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. अखेर तलावाच्या काठावर कपडे सापडल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेत ओमकार बाबासाहेब हंगे , रा.बीड , श्लोक जगदीश मानकर (वय १३ वर्षे,रा. अमरावती),प्रसाद शंकर देशमुख( वय.१३ रा.नांदेड),नैतिक गोपाल मोरे ( वय.१३ वर्षे, रा. अकोला ) असे दुर्दैवी मुलांची नावे आहेत. मुलांच्या मृत्युने खळबळ उडाली आहे.चाकण पोलिसांच्या वतीने सदर घटनेचा अधिकचा तपास करण्यात येत आहे.