तळेगाव ढमढेरे येथील गणेश नरके यांचा गायकवाड परिवाराच्या वतीने सत्कार

swarajyatimesnews.com


शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड


तळेगाव ढमढेरे येथील रहिवासी श्री. गणेश नरके यांची पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदी निवड झाल्याबद्दल शिक्रापूर येथे गायकवाड परिवाराच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत आणि अथक परिश्रम घेत नरके यांनी हे यश संपादन केल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.


शिक्रापूरचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष मोहन विरोळे यांच्या हस्ते गणेश नरके यांना शाल, श्रीफळ, नारळ आणि पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. यावेळी नरके यांच्या पुढील वाटचालीस व भावी प्रगतीस उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्याला भाजप आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, नवनाथ भुजबळ, सावतामाळी ट्रस्टचे सचिव पोपटराव गायकवाड, महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सर्व पदाधिकारी तसेच गायकवाड परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावतामाळी ट्रस्टचे सचिव पोपटराव गायकवाड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पंढरीनाथ गायकवाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!