शिक्रापूर येथे फुलांच्या वर्षावात पहिलीतल्या चिमुकल्यांचे शाळेत स्वागत

Swarajyatimesnews

“मुलं तुमची, झाडं आमची” उपक्रमाने पालकही आनंदी

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक १६ जून २०२५ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बालचमु आनंदाने शाळेत दाखल होताना पाहायला मिळाले.

विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने सुवासिनींनी ओवाळून करण्यात आले. फुलांच्या वर्षावात आणि वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व शूज वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, उपसरपंच वंदना भुजबळ, माजी उपसरपंच पूजा भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य उषा राऊत, त्रिनयन कळमकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नवनाथ सासवडे,माजी उपसरपंच सुभाष खैरे, अध्यक्ष सनी जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत मांढरे, सदस्य शितल जाधव व अर्पणा ढोले, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर दरवडे व दादा मांढरे उपस्थित होते.

शिक्षण विभागातर्फे डायटचे अधिव्याख्याता जाधव सर, विषयतज्ञ संजना आरोडे मॅडम, केंद्रप्रमुख प्रकाश लंघे सर, मुख्याध्यापिका साधना शिंदे मॅडम व शिक्षकवृंद यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

प्रवेशोत्सवानिमित्त “मुल तुमचे, झाड आमचे” या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने पालकांना झाडांची रोपं वाटप करण्यात आली. सरपंच रमेश गडदे यांनी झाडांचेही पालकत्व स्वीकारण्याचे आवाहन पालकांना केले. नवनाथ सासवडे यांनी विद्यार्थ्यांच्या वाढदिवसादिवशी शाळेसाठी उपयुक्त वस्तू भेट देण्याचे आवाहन केले. पूजा भुजबळ यांनी शासनाच्या आनंददायी शिक्षण उपक्रमाचे कौतुक केले तर सुभाष खैरे यांनी पालकांनी जबाबदारीने सहभाग घ्यावा असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाकळकर सर यांनी केले व आभारप्रदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सनी जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!