भीमा नदीपात्रात अज्ञात पुरुषाचा मृतदेह; हातातील ‘स्मार्ट वॉच’ ठरणार शोधण्यात महत्त्वाचा सुगावा?

Swarajyatimesnews

स्वराज्य टाईम्स वृत्तसेव

येथील भीमा नदीच्या पात्रात अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाच्या एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, पोलीस पाटलांच्या माहितीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हातातील ‘स्मार्ट वॉच’वरून ओळख पटवण्याचे प्रयत्न – मृतदेहाची अवस्था पाहता ओळख पटवणे आव्हानात्मक बनले आहे. मात्र, मृताच्या डाव्या हाताच्या मनगटावर काळ्या रंगाचे स्मार्ट वॉच, एका बोटात धातूची अंगठी, अंगात काळ्या रंगाची नाईट पॅन्ट (बाजूला पांढरी पट्टी) आणि कमरेला लाल-पांढरा करदोरा बांधलेला आहे. मृताची उंची १७० ते १७५ सें.मी., शरीरयष्टी मध्यम असून चेहऱ्यावर दाढी-मिशी आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अंमलदार व्ही. आर. सरोदे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या वर्णनाची कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास अथवा याबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ शिक्रापूर पोलीस स्टेशन किंवा मोबाईल क्र. ९०४९८३३०८३ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!