मांजरी खुर्द (ता.हवेली)येथील वारुळे दाम्पत्य आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासात नवीन माहिती समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या करून स्वतः हा आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी मृत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी राहत्या घरात नागनाथ वारुळे (वय ४२) हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्याची पत्नी उज्वला (वय ४०) ही बाजूला बेडवर मृत अवस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी दोघांची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती.
मात्र, उज्वला यांचा शवविच्छेदन अहवालात अंगावरील मारलेले घाव, लोखंडी हातोडा, चाकू आणि रक्ताने माखलेली ओढणी घटनास्थळी आढळून आले होते. यावरून नागनाथ याने पत्नीची हत्या केल्याचे निष्पन्न झालं. मारहाण करून गळा आवळून त्याने पत्नीची हत्या केली. यानंतर वाघोली पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला.