Category: Latest Update
३९६ विजचोरांवर महावितरणची एकाच दिवशी कारवाई
सोलापूर जिल्ह्यात महावितरणने मंगळवारी (दि.१)३९६ वीजचोरांवर एकाच दिवशी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वीजचोरी करणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे, तर विजेचा गैरवापर करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या नेतृत्वात, एकाच दिवशी जिल्हाभरात ही कारवाई करण्यात आली. १७७९…
MPSC च्या पहिल्याच प्रयत्नात राज्यात प्रथम येत धाराशिवच्या महेश घाटुळे यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड
चिकाटी, कठोर परिश्रम, आणि अभ्यासातील सातत्य याच्या बळावर धाराशिव जिल्ह्यातील घारगावच्या डॉ. महेश अरविंद घाटुळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२३ च्या निकालात पहिल्याच प्रयत्नात राज्यात प्रथम येत उपजिल्हाधिकारी पदावर यशस्वी झेप घेतली आहे. अवघ्या २९ वर्षांच्या महेश यांनी आपल्या या यशाने कळंब तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.(MPSC) महेश यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत…
चाकणमध्ये भीषण अपघात गर्भवती महिलेचा मृत्यू, चालकासह दोघे गंभीर जखमी
चाकण येथील बिरदवडी फाटा ते पुणे-नाशिक महामार्गावर मंगळवारी (दि. २४) मोटार कार आणि पिकअप जीपच्या समोरासमोर धडकेत एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे, तर चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव हर्षदा केतन खानेकर (वय २७, सध्या रा. भायखळा, मुंबई, मूळ रा. नारायणगाव, जुन्नर) असे आहे. या प्रकरणी मोटार कार…
राज्यस्तरीय स्पर्धेत कोरेगाव भिमाचा विद्यार्थी राज्यात प्रथम
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील विद्यार्थ्याने मराठी एकांकिका नाटक सादर करत तालुका ,जिल्हा व आता राज्य स्तरावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला असून कोरेगाव भिमा येथील शिवंश अतुल मोटे या विद्यार्थ्याने जिल्हा परिषद शाळेचे नाव राज्यात चमकवल्याने त्याच्यावर कोरेगाव भिमा पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ आर एम धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित…
सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटीने वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय..
ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम विकास) राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यातील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.तर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम…
पुण्याच्या प्रसिद्ध उद्योगपतीचा निर्घृण खून; पत्नी जखमी
चाकू, लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती विनायक काशिनाथ नाईक (वय ५२) यांचा रविवारी पहाटे कारवार तालुक्यातील हाणकोण येथे पाच ते सहा मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला. चाकू, लोखंडी रॉड आणि तलवारींच्या सहाय्याने झालेल्या या हल्ल्यात नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी वृषाली नाईक या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. विनायक नाईक हे सातेरी देवीच्या…
पुण्यातील खड्ड्यांवर थेट राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी ,पुणे पोलिसांना पत्र
पुण्यातील खड्ड्यांमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही नाराज असल्याचं पुढं आलं असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुण्यात २ आणि ३ सप्टेंबरला पुण्यात आल्या होत्या. राष्ट्रपती पुण्यात येणार असल्याने पुणे महानगर पालिकेने रस्त्यांची डागडुजी केली मात्र, ती चुकीच्या पद्धतीने केली. त्यामुळे या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती कार्यालयाने पुणे पोलिसांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, २६ तारखेला पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी…
वडगाव शेरीमध्ये मिरवणुकीत हाय टेन्शन वायरला झेंड्याचा रॉड लागल्याने वीजेचा धक्क्याने एका युवकाचा मृत्यु, तिघे जखमी
चंदननगर – मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस (मिरवणूक) काढण्यात आला होता. यावेळी रथावर चढून झेंडा फिरवणाऱ्या दोन तरुणांचा विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली होती. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील वडगाव शेरी परिसरात आज सकाळी साडे अकराच्या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जुलूस काढण्यात आला…
खेड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप पर्वते यांचे ऑन ड्युटी हृदयविकाराने निधन
पुणे – खेड पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरक्ष पर्वते (वय ३५) यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. मुळगाव अकलूज, सोलापूर येथील रहिवासी असलेल्या पर्वते यांची काही महिन्यांपूर्वीच खेड येथे बदली झाली होती. सकाळी कामावर आल्यावर अचानक त्यांना झटका आला आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला….
शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांमधून उत्पन्नाची नवी संधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई – शेतकऱ्यांना आता सौर कृषिपंपांमधून उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत शेतकरी सौर पॅनेल्सद्वारे निर्मित अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये विकू शकतील, ज्यातून त्यांना आर्थिक लाभ होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शुक्रवारी ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेच्या वेबसाईट आणि माहिती पुस्तिकेचे उद्घाटन करताना फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण…
