Category: Latest Update
माणिक दादा सातव पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात २२ हजार रुग्णांची तपासणी
“दादांच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार” – कु. सार्थक माणिकराव सातव कोरेगाव भिमा – वाघोली (ता. हवेली) येथे स्वर्गीय माणिकराव दादा सातव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कुमार सार्थक माणिकराव सातव पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या शिबिरास २५ ते ३० हजार नागरिकांनी भेट दिली…
समाजातील विकृत विचारसरणीला आळा घालण्यासाठी मुल्यसंस्कार आणि स्वसंरक्षण अभियानाची गरज – नितीन मोरे
शिक्रापूर आणि चाकण येथे पार पडलेल्या सामूहिक सरस्वती पूजन व विद्यारंभ सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. शिक्रापूर, (ता. शिरूर) “समाजातील विकृत विचारसरणी दूर करण्यासाठी आणि अप्रिय घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी सुसंस्कारासोबतच स्वसंरक्षण तंत्राचे शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक आहे,” असे मत नितीन मोरे यांनी व्यक्त केले. ते दिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने आयोजित सामूहिक सरस्वती…
गणेश कुटे युवा मंचच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन
विविध मालिकांमधील तारकांची लाभणार उपस्थिती आव्हाळवाडी (ता. हवेली)गणेश (बापू) कुटे युवा मंचच्या वतीने आव्हाळवाडी येथे रविवारी अखिल दहीहंडी उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला मालिकांमधील कलाकारांसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक ग्रामपंचायत सदस्य अविनाश कुटे, विशाल कुटे, अजित कुटे, तुषार कुटे व गणेश (बापू)…
राळेगणसिद्धी येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे अधिवेशन संपन्न
उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता पुरस्काराने खंडू गव्हाणे व राहुलकुमार अवचट सन्मानित दि.१८ ऑगस्ट – माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या राज्यव्यापी अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी माहिती अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. डिंग्रजवाडी (ता. शिरूर ) येथील खंडू गव्हाणे व यवत येथील राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता २०२४ चा पुरस्कार देऊन…
मनोज जरांगे पाटलांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना तुकडे तुकडे करण्याची धमकी
पुणे – जरांगे पाटील यांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना अज्ञाताने मोबाईलवर तुकडे तुकडे करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि. १७ ऑगस्ट २०२४) रात्री दहा वाजेच्या सुमारास ॲड. गणेश म्हस्के घरी जात असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने…
वाघोलीकरांच्या समस्यांसाठी ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन
मॅरेथॉन मध्ये सहभाग होणाऱ्या सर्वांनी एक रुपया आणण्याचे आवाहन जमा होणारी रक्कम महानगर पालिकेला देणार भेट वाघोली (ता. हवेली) येथील नागरिकांच्या विविध समस्यांमधून सुटका होण्यासाठी रावलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता अभिषेक लॉन्स, वाघेश्वर मंदिराजवळ, पुणे नगर रोड, वाघोली येथून सुरू होणार…
रा.प.घो.स.सा. कारखान्याचे चेअरमन ऋषिराज पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
सणसवाडी येथील भैरवनाथ महाराजांचा घेतला आशिर्वाद सणसवाडी (ता. शिरूर) येथे आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांचे सुपुत्र व रावसाहेब दादा पवार घोड गंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज पवार यांचा सणसवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त चेअरमन ऋषिराज पवार यांनी सणसवाडी येथील भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेतले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित…
पोलीस बांधवांना स्वाभिमानी मराठा महासंघाच्या सर्व महिलांनी बांधली राखी
समाजासह महिला भगिनींच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र काम करणारे पोलीस बांधव आमचे सख्खे भाऊच – अलका सोनवणे ( हरगुडे) लोणीकंद (ता.हवेली) येथील पोलीस चौकीतील पोलीस बांधवांना स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला भगिनींनी राखी बांधत अनोखी राखी पौर्णिमा साजरी केली असून कुटुंबापेक्षा समाजाला जास्त वेळ देणाऱ्या व समाजाची , महिला भगिनींच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र काम करणारे पोलीस बांधव म्हणजे आमचे…
धक्कादायक ! वडिलांनी पाय दाबण्यास नकार दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून
नागपूर – एक धक्कादायक घटना घडली असून मनाला सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ३३ वर्षीय मुलगा कुशल याने शनिवारी दुपारी वडील दत्तात्रय यांना पाय दाबण्यास सांगितले. मात्र, वडिलांनी त्याला नकार दिला. यातूनच चिडलेल्या मुलाने वडिलांना शिवीगाळ करत त्यांना जबर मारहाण केली. दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मारहाणीत जखमी…
पुणे ट्रॅफिक पोलिसांनी सीट बेल्ट न लावणाऱ्याला दंड नाही तर बांधली ‘सुरक्षेची राखी’
अरे दादा तू स्वतः सुरक्षित राहशील तर बहिणीची रक्षा करशील ना ? पुणे पोलिसांच्या सुरक्षिततेचा व्हिडिओ व्हायरल पुणे – सांस्कृतिक परंपरेचा आणि वाहतुकीच्या नियमांची सांगड घालत पुणे पोलिसांनी एक अनोखी शक्कल शोधून काढली आहे. पुण्यात सध्या वाढतं ट्राफिक आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या व असुरक्षित प्रवास करणाऱ्यांची लक्षणीय वाढली असून ट्राफिक सिग्नल तोडल्याने होणाऱ्या अपघातांचं…
