पारंपारिक वाद्यांच्या गजरात पुष्पवृष्टी करत स्वागत
सणसवाडी (ता. शिरूर) येथे ढोल ताशा,हलागीचा ठेका, फटाकड्यांची आतषबाजी, तुतारीच्या गजरात महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ॲड अशोक रावसाहेब यांचे जल्लोषाच्या वातावरणात पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले.
आमदार अशोक पवार व सणसवाडी करांचे जिव्हाळ्याचे अनोखे नाते असून आमदार अशोक पवार यांच्या पाठीशी ठाम उभे असणारे व सणसवाडी येथील विविध विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देणारे ॲड अशोक पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने नेहमीच त्यांच्यावर या गावाने भरभरून प्रेम केले आहे.

महाविकास आघाडीचे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड. अशोक रावसाहेब पवार यांनी (दि.५ नोव्हेंबर) रोजी श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे श्री छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
ॲड.अशोक पवार यांनी वढु बु., कोरेगाव भिमा, धानोरे, दरेकरवाडी, आपटी, सणसवाडी, वाजेवाडी, शिक्रापूर, पिंपळे जगताप, कोंढापुरी, वाडा पुनर्वसन, भांबर्डे, डिंग्रजवाडी, कळवंतवाडी, आंबळे या गावांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करत शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्ते व मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, ग्रामस्थ,मतदार बंधू उपस्थित होते तर महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.
शरद पवार यांनी शिरूर तालुक्यावर भरभरून प्रेम केले. उद्योगनगरी सणसवाडी येथे औद्योगिक वसाहत आणण्यासह ,येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चासकमान कालव्याचे पाणी,रोजगार, रस्ते ,वीज यांच्यासह विविध विकास कामे करत मोठी औद्योगिक प्रगती करण्यात मोलाचे योगदान दिले यामुळे येथे शरद पवार यांच्या विषयी मोठा आदर व आपुलकी पाहायला मिळते.तसेच आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने सणसवाडी करांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम करत असून त्यांच्या जिव्हाळ्याचे गाव सासणवडी म्हणून परिचित आहे.