डिंग्रजवाडीत बिबट्या जेरबंद; वनविभागाच्या प्रयत्नांना यश

Swarajyatimesnews

डिंग्रजवाडी (ता. शिरूर) परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचा सतत वावर आढळून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले असून, ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

बिबट्याच्या वावराची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे जिल्हा परिषद सदस्या दिपाली राहुल गव्हाणे आणि सरपंच प्रसाद गव्हाणे यांच्या माध्यमातून डिंग्रजवाडी गावात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसविण्यात आला होता. वनविभागाने केलेल्या प्रयत्नांनंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

यावेळी पोलीस पाटील साईनाथ गव्हाणे, माजी अध्यक्ष अजय गव्हाणे, कोरेगाव भीमा कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन प्रवीण गव्हाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष सागर गव्हाणे, बळीराम गव्हाणे, हनुमंत गव्हाणे, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष गव्हाणे, दादा गव्हाणे आणि रामभाऊ उपस्थित होते.

बिबट्या जेरबंद झाल्याने डिंग्रजवाडी परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, वनविभागाच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!