काशी विश्वनाथ दर्शन व गंगेच्या आरतीत भक्तांची किरण साकोरेंच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रार्थना

Swarajyatimesnews

पुणे: वाराणसी,काशीच्या पवित्र घाटांवर सोमवारी सायंकाळी भक्तिभाव, श्रद्धा आणि शांततेचे वातावरण अनुभवायला मिळाले. लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील यात्रेकरूंनी दशाश्वमेध घाटावर गंगेच्या आरतीचा दिव्य आणि अध्यात्मिक अनुभव घेतला.

आरतीचा दिव्य क्षण : संध्याकाळी लालसर आकाशाच्या पार्श्वभूमीवर गंगेच्या लहरींवर थरथरणाऱ्या दीपज्योतींनी घाट उजळून निघाला. शंखनाद, घंटांचा निनाद आणि कापराच्या सुवासाने वातावरणात पवित्रतेचा भाव पसरला. या आरतीचे औचित्य श्रीकांत कंद आणि माजी सरपंच मोनाली कंद यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. आरतीदरम्यान भाविकांनी एकमुखाने प्रार्थना केली “माता गंगे, काशी विश्वनाथ, आमच्या किरण साकोरेंच्या सर्व स्वप्ने पूर्ण होवोत.”

किरण साकोरे, समाजकारणातील प्रेरणास्थान : आरतीदरम्यान भाविकांच्या चर्चेत आणि प्रार्थनेत किरण साकोरे यांच्या कार्याचा उल्लेख सातत्याने होत होता. ते युवकांना प्रेरणा देणारे सामाजिक कार्यकर्ते आणि सेवाभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यातील सचोटी, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि माणुसकीचा स्पर्श भाविकांना भावला होता. गंगेच्या प्रवाहात सोडलेले दीप जणू या प्रार्थनांचे साक्षी ठरले, आशा आणि तेज घेऊन पुढे सरकत होते.

Swarajyatimesnews
वाराणसी – येथे गंगा आरतीसाठी उपस्थित भाविक भक्त व किरण साकोरे

उत्कृष्ट ,नियोजन,आयोजन आणि सेवा भावातील समर्पण : या यात्रेची काटेकोर आखणी प्रदीप दादा कंद युवा मंच, पै. किरण साकोरे मित्र परिवार आणि सेवाभावी स्वयंसेवकांनी केली होती. यामध्ये यात्रेकरूंकरिता स्वच्छ भोजन व पिण्याचे पाणी, निवासासाठी सुरक्षित व सुलभ व्यवस्था, आरोग्यसेवेसाठी स्वयंसेवकांकडून तातडीची मदत, वयोवृद्ध यात्रेकरूंकरिता स्वतंत्र सोयींची उपलब्धता, यात्रेकरूंनी या व्यवस्थेचे कौतुक करत या यात्रेला “आध्यात्मिकतेसोबत सेवा वृत्तीचा आदर्श” असे वर्णन केले. काशी

विश्वनाथांचे दर्शन आणि समाधानी भाव : सर्व यात्रेकरूंना काशी विश्वनाथांचे निवांत दर्शन लाभले. दर्शनानंतर त्यांच्या चेहऱ्यावर शांततेचा आणि समाधानाचा तेजस्वी प्रकाश दिसत होता. भक्तांनी एकमुखाने नम्र प्रार्थना केली “जशी पवित्र गंगा अखंड वाहते, तशीच किरण साकोरे यांच्या कार्ययात्रेला अखंड यश मिळो.”

भव्य दिव्य काशी नंतर आता प्रभू श्री रामांच्या आयोध्या दर्शनासाठी भाविकांचे प्रस्थान : काशीत दिव्य अनुभूती घेतल्यानंतर यात्रेकरूंनी पुढचा प्रवास प्रभू श्रीरामाच्या नगरी अयोध्याकडे सुरू केला आहे. भाविकांच्या मनात भक्ती, सेवा आणि समर्पणाचा भाव अधिक दृढ झाला असून, त्यांच्याच शब्दांत “ही यात्रा धार्मिकतेसोबत सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारी ठरली; आणि गंगेच्या साक्षीने आमच्या किरण साकोरे यांच्या सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत, अशी आमची अखंड प्रार्थना आहे.” भक्तीचा

प्रवाह आणि सामाजिक प्रेरणा : काशी घाटांवरील हा सोहळा केवळ धार्मिक नव्हे, तर आत्मिक आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरला. भक्तांच्या श्रद्धेमध्ये किरण साकोरे यांच्या कार्यनिष्ठेचा आणि सेवाभावाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत होता. प्रत्येक प्रार्थनेतून उमटलेला भाव “भक्ती, सेवा व समर्पणाच्या मार्गावरून स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या किरण साकोरे यांना गंगेचे आशिर्वाद सदैव लाभोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!