आदर्श सरपंच रमेश गडदे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा

Swarajyatimesnews

वढू बुद्रुक (ता. शिरूर) “सामाजिक कार्य हीच खरी सेवा” हे ब्रीदवाक्य अंगीकारून शिक्रापूर ग्रामनगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी आपला वाढदिवस वंचित आणि उपेक्षित घटकांप्रती कळवळा दाखवत, वढू बुद्रुक येथील माहेर सामाजिक संस्थेत उत्साहात साजरा केला. त्यांच्या या कृतीने त्यांनी केवळ एक दिवस नव्हे, तर आयुष्यभर समाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

राजकारणी नव्हे, समाजाच्या हृदयाला स्पर्श करणारे कार्य करणारा अनोखा समाजसेवक – आदर्श सरपंच रमेश गडदे हे केवळ एक राजकारणी नाहीत, तर ते जनतेच्या सेवेसाठी झपाटलेले खरे समाजसेवक आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी केवळ गावाचा विकासच साधला नाही, तर समाजाच्या हृदयालाही स्पर्श केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कर्तव्य फाउंडेशनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव करण्यात आला.

दिव्यांगांना स्वावलंबनाचा हात ते गावाच्या पाणीप्रश्नाची सोडवणूक –  सरपंच रमेश गडदे यांनी दिव्यांगांसाठी स्वावलंबी उपजीविकेचे दरवाजे खुले करत उद्योजकतेच्या अभिनव उपक्रमांची सुरुवात केली. या उपक्रमाने त्यांना राज्यभरातून गौरव मिळवला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी एस.टी. स्थानकात सीसीटीव्ही यंत्रणाबसवली, तर प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित प्रवासासाठीही ते प्रयत्नशील राहिले यासह वृक्ष लागवड ,आरोग्य शिबीर, डोळे तपासणी शिबीर ,शालेय प्रश्न संच वाटप असे सामाजिक कार्य केले आहे.

गावाला उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून त्यांनी ठोस आंदोलक भूमिका घेतली आणि पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. आरोग्य शिबिरे आणि जनजागृती मोहिमांमुळे गावाचा सामाजिक आराखडा अधिक उजळून निघाला आहे.

शैक्षणिक प्रेरणा: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आशेचा नवा किरण –  या कार्यक्रमात सरपंच गडदे यांची कन्या शुभेच्छा गडदे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज राहण्याचे आणि कठीण संघर्षातूनच यश मिळते, असा संदेश दिला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मेश्राम सर यांच्या मार्गदर्शनाखाली माहेर संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी शिक्षण उपक्रमाची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास मिळणार आहे. हे शैक्षणिक योगदान त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे.

माहेरच्या विद्यार्थ्यांकडून अनोखे स्वागत, गडदेंच्या भावना गहिवरल्या – माहेर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी रमेश गडदे यांचे औक्षण करत, स्वतः तयार केलेले पुष्पहार अर्पण करत आणि गाणी म्हणत आपुलकीने स्वागत केले. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही भावूकतेचे प्रतिबिंब उमटले. संस्थेच्या अध्यक्षा हिराबेग मुल्ला, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.

रमेश गडदे यांचे कार्य केवळ ग्रामपंचायतीपुरते मर्यादित न राहता, समाजातील अंतर्भूत गरजा ओळखून त्यावर कृतीशील उपाय करणारे ठरले आहे. त्यामुळेच त्यांना मिळालेला “आदर्श सरपंच पुरस्कार” हा केवळ गौरव नसून, त्यांच्या कार्याच्या खोल सामाजिक परिणामांची पोचपावती आहे. शिक्रापूर ग्रामनगरीतील विकास आणि समाजोन्मुख उपक्रम हे जिल्ह्याच्याही पलीकडे आज  एक प्रेरणादायी आदर्श म्हणून पाहिले जात आहेत.

 यावेळी  कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनिषा गडदे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत मैड, बंधू सुरेश गडदे, आदर्श ग्रंथपाल संतोष काळे, सामाजिक कार्यकर्ते महेश शिर्के, पतंजली शिरुर अध्यक्ष अंकुश घारे, पत्रकार निलेश जगताप ,हार्दिक गडदे, शुभेछा गडदे, प्रविण लोखंडे, विशाल लोखंडे, मेश्राम सर, संकेत गडदे, नागेश डोणगापुरे, कानीफ शिर्के, ऋषी गडदे, निखिल सोनवणे, अभिजित खोले, शुभम चव्हाण, मंगेश सकट, माहेर संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!