सखे, मला माफ कर, तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग.’ शिरीष महाराजांचे भावी पत्नीसाठी काळीज पिळवटून टाकणारे अखेरचे शब्द

Swarqjyatimesnews

पुणे – माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्नं तोडून जातोय. कुंभमेळा राहिला, वारी राहिला, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं. सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू. तू खूप गोड आहेस. निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल. जप स्वत:ला. एवढा काळ थांबलीस, आता मीच नसेल त्यामुळे थांबू नको. पुढे जा, खूप मोठी हो आणि हो खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम घे. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या. मला माफ कर…असे पत्र लिहीत आपल्या मनातील अखेरच्या भावना व वेदना चिठ्ठीत व्यक्त करत शिरीष महाराज मोरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीने मन हेलावून जाते.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज आणि शिव व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. काल सकाळी ८:३० वाजता ही दुःखद घटना घडली. त्यांच्या जाण्यामुळे तीर्थक्षेत्र देहू गावावर शोककळा पसरली आहे.

आत्महत्येपूर्वी त्यांनी आई-वडील, पत्नी, होणाऱ्या पत्नी आणि मित्रांसाठी भावनिक चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. त्यांनी या चिठ्ठ्यांमध्ये आपल्या मनातील वेदना मांडत आपल्या कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कर्जाचा डोंगर, संघर्ष आणि अपेक्षांचा भार सांभाळता न आल्यामुळे त्यांनी जीवन संपवल्याचे समोर आले आहे. शिरीष महाराजांना चार चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. या चार चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेल्या मजकुरात त्यांनी मनात अनेक वर्षापासून मनात साचलेलं सगळं सांगितलं आहे.

पहिली चिठ्ठी , प्रिय मम्मी, पप्पा, दिदी

काय लिहू मी, आयुष्यात जे जे करायचं म्हटलं त्या प्रत्येक निर्णयात तुम्ही पाठीशी अभे राहिलात. लोकांना जे मिळवण्यासाठी किती तरी वर्षे लागतात ते तुमच्या पाठिंब्यामुळे काही वर्षातच तुमच्या पाठिंब्यामुळे मिळालं आणि मी इथवर पोहचलो. आयुष्यात कधीच तुम्हाला माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही. एवढं सुंदर आयुष्य जगलो. मला जन्म दिला. एवढं घडवलं पाठीशी उभे राहिलात पण नेमकं जेव्हा मीच तुमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तेव्हाच मी तुमचा हात सोडून जातोय. कधी कधी सर्व मिळून सुद्धा माणूस युद्ध हरतोच, मी ही थांबत आहे. मला माफ करा तुम्हाला एकटं सोडून जातोय 

दुसरी चिठ्ठी , माझी लाडकी पिनू, प्रियांका…

खरं तर तुझा आता कुठं हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणी मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो. माफ कर. आयुष्यात सर्वांत जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तुझा आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही. माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्नं तोडून जातोय. कुंभमेळा राहिला, वारी राहिला, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं. सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू. तू खूप गोड आहेस. निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल. जप स्वत:ला. एवढा काळ थांबलीस, आता मीच नसेल त्यामुळे थांबू नको. पुढे जा, खूप मोठी हो आणि हो खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम घे. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या. मला माफ कर… तुझाच अहो..

तिसरी चिठ्ठी, प्रिय बाबा आणि सर्व परिवार

खूप कष्ट करा आणि इको सिस्टिम उभी करा… मला माफ करा… थांबू नका, लढत राहा…विजय नक्कीच आपला आहे. स्वत:ला जपा आणि मधून अधून आई वडिलांकडे लक्षं द्या… आता पूर्णविराम देतो

चौथी चिठ्ठी, प्रिय मित्रांनो,

खरतर सोडून जाणाऱ्या माणसाने मदत मागू नये पण कृपा करून आई वडिलांना सांभाळा, दिदीचं चागलं स्थळ पाहून लग्न लावून द्या… खूप मोठा कर्जाचा डोंगर माझ्यावर आहे. तेवढा आई वडिलांच्या डोक्यावरीन उतरवा… कोणाचे किती आहेत हे वडिलांना माहित आहे तरी सुद्धा इथे लिहित आहे.इतकच भीक वाटत असेल हे मी सुद्धा फेडू शकलो असतो… हे सुद्धा वाटत असेल पण ताकद नाही आता लढण्याची माफ करा मला….

आणि हो आमची नवरीबाई. तिची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त करून मी चाललो आहे. खूप गोड आहे प्रियांका. तिला कधी वेळच देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा बघा. नाहीतर ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!