कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने शिक्रापूर येथील वाचनालयास पुस्तक संच भेट

Swarajyatimesnews

तुषार आळंदीकर यांच्याकडून सलग पाच वर्ष स्वखर्चाने वाचनालयास दहा सभासद देण्याचा स्तुत्य उपक्रम

 शिक्रापूर (ता.शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्त्या व कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा रमेश गडदे यांनी स्वखर्चाने  शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालयास एक पुस्तक संच भेट दिला आहे. ग्रंथपाल संतोष काळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिक्रापूर वाचनालयास स्वखर्चाने दहा सभासद दिले असून गेली पाच वर्ष अखंडपणे स्वखर्चाने वाचनालयास सभासद जोडण्याचा अनोखा उपक्रम तुषार आळंदीकर करत असून या उपक्रमाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांनी विशेष कौतुक केले.

याप्रसंगी शिक्रापूर ग्राम पंचायतीचे आदर्श सरपंच रमेश गडदे ग्राम विकास अधिकारी शिवाजी शिंदे ,ग्रंथपाल संतोष काळे,ग्राम पंचायत सदस्य प्रकाश वाबळे, त्रिनयन कळमकर ,सहाय्यक कृषी अधिकारी अशोक जाधव, तुषार आळंदीकर, हनुमंत मासळकर,  चंद्रकांत खेडकर, बबन मांढरे , ग्रामपंचायत कर्मचारी अनंता दरवडे आदी वाचनालय सभासद व मान्यवरांच्या उपस्थितीत वाचनालयास ग्रंथ भेट देण्यात आले. 

कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा गडदे यांनी वाचनाची प्रचंड आवड असल्याने व वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी तसेच वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने आपल्या ग्रंथालयास ग्रंथ भेट देत असल्याचे यांनी सांगितले. तर तुषार आळंदीकर यांनी यापुढेही हा उपक्रम सातत्याने चालू ठेवणार असल्याचे आश्वासन दिले.

   यावेळी स्वयंस्फूर्तीने ज्या नागरिकांना उत्तम दर्जाचे ग्रंथ भेट द्यावयाचे असतील त्यांनी ग्रामपंचायत वाचनालय शिक्रापूर येथे संपर्क करण्याचे आवाहन आदर्श ग्रंथपाल संतोष काळे पाटील यांनी केले आहे. यावेळी सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!