Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी अभिषेक दादाभाऊ शेळके यांची बिनविरोध निवड
शिरूर(ता.शिरूर) महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या भक्तीचे श्रद्धास्थान पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी पिंपरी दुमाला गावचे सामाजिक कार्यकर्ते अभिषेक शेळके यांची निवड झाली. सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सोमवारी झालेल्या बैठकीत या अगोदरचे अध्यक्ष सुनील अनंथा सोनवणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवरती विश्वस्त मंडळाची चर्चा झाली या विश्वस्त मंडळामध्ये सर्वानुमते अभिषेक शेळके…
सणसवाडीतील वसेवाडी शाळेचा एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत डंका
सणसवाडी (ता.शिरूर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी (सणसवाडी) शाळेतील ३८ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, दोन विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तर शंभर टक्के निकालासह उल्लेखनीय यश मिळवले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून…
डिंग्रजवाडी शाळेतील विद्यार्थ्याची जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड
डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी कु. ओंकार चंद्रकांत बांगर याची जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत निवड झाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांनी ही माहिती दिली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ओंकारने चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, त्यामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वर्गशिक्षिका अनुराधा विजय…
“छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शंभू भक्तांना पृथ्वी ग्राफिक्सकडून ताक व पाण्याचे वाटप”
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या 336 व्या पुण्यतिथीनिमित्त, वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधीस्थळी महाराष्ट्रभरातून आलेल्या शंभू भक्तांसाठी कोरेगाव भीमा येथील पृथ्वी ग्राफिक्स डिजिटल फ्लेक्स व प्रिंटिंगतर्फे तसेच संजय सुभाषचंद्र शिवले आणि कौस्तुभ दशरथ होळकर यांच्या वतीने हजार पाण्याच्या बाटल्या आणि ताकाचे वाटप करण्यात आले. भर दुपारच्या उन्हात…
महाराष्ट्राचे तीर्थस्थळ म्हणून श्री क्षेत्र वढू बुद्रुक करणार विकसित – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३६व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित धर्मसभेत वढू बुद्रुक हे महाराष्ट्राचे तीर्थस्थळ म्हणून विकसित करण्याची घोषणा केली आहे. तसेच, मृत्यूंजय अमावस्येच्या दिवशी, ज्यादिवशी छत्रपती संभाजी महाराज वीरगतीला प्राप्त झाले, त्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना दिले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले….
पत्रकार विजय लोखंडे यांचा राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची ध्येय एज्युकेशन फाउंडेशनने घेतली दखल ‘Ideal Journalist’ award याप्रसंगी हडपसरचे आमदार चेतन तुपे,फाउंडेशनचे संस्थापक सुदाम शेंडगे,राज्य मार्गदर्शक सोमनाथ शिंदे,सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे,योजना संचालनालयचे संचालक डॉ.महेश पालकर,पालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भंगे,ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे,सचिव सोनाली गाडे,राज्यप्रमुख संदीप पाटील,सारिका शिंदे,उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विजय लोखंडे यांनी गेल्या १८…
पुणे जिल्हा परिषदेकडून केंदूर ग्रामपंचायतीचा सन्मान; क्षयरोगमुक्त गावाचा बहुमान
केंद्रूर (ता. शिरूर) , २६ मार्च —पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने केंदूर ग्रामपंचायतीचा “क्षयरोगमुक्त गाव” म्हणून विशेष सन्मान करण्यात आला आहे. क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे केंदूरने गव्हाणे सन्मान मिळवलं आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात केंद्रूर (ता. शिरूर) ग्रामपंचायतीचा क्षयरोगमुक्त (टीबीमुक्त) गाव म्हणून सन्मान करण्यात आला. सरपंच प्रमोद प-हाड, उपसरपंच शालन…
शिक्रापूर ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांना ३० लाखांहून अधिक निधीचे वाटप
शिक्रापूर ता.शिरूर, दि. २३ मार्च — शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात दिव्यांग बांधवांना प्रत्येकी ₹३४,९७२ रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी एकूण ३० लाखांहून अधिक निधीचे वितरण शिक्रापूर ग्राम नगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद पाहायला मिळाला. धनादेश वितरण प्रसंगी शिक्रापूरचे आदर्श सरपंच…
कोरेगाव भिमा येथे कीयोन कंपनीत शिरला बिबट्या..
नागरिकांनी काळजी घ्यावी, वनविभाग कर्मचारी कियोन कंपनीत दाखल बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू – सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे सकाळी एक दीड दोन वर्षांचा बिबट्या गव्हाणे वस्ती जवळ असलेल्या कियोन कंपनीत शिरल्याने मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या अधिकारी स्मिता राजहंस यांनी नागरिकांनी घाबरून जावू नये व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी…
हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स आगीची दुर्घटना नव्हे हत्याकांड! चालकाने घडवले जळीतकांड..
ज्यांच्यावर रोष होता, तेच वाचले…निष्पाप मात्र जिवानिशी गेले.. पुणे – हिंजवाडी परिसरात एका टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत एकूण चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला. या ट्रॅव्हल्समध्ये कंपनीचे कर्मचारी बसलेले होते.दरम्यान, याच आगीच्या घटनेतील धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही आग काही तांत्रिक बिघाडामुळे लागलेली नव्हती. खु्द्द ड्रायव्हरनेच हा घातपात घडवून…
