Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
धक्कादायक! वाघोलीत चापट मारल्याच्या रागातून कंटेनर चालकाने दुसऱ्याला चाकाखाली चीरडल्याने जागीच मृत्यू
हॉटेलमधील बिल देण्याचा वाद बेतला जीवावर वाघोली (ता.हवेली) येथे कटकेवाडी परिसरात एका किरकोळ वादातून कंटेनर चालकाने दुसऱ्या चालकाला थेट कंटेनरखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमधील बिल भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपीने राग मनात ठेवून आपला सहकारी चालकाला कंटेनरखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबाला केलिव आर्थिक मदत
माझी मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ३२ लाखांच्या कर्जाची रक्कम कुटुंबियांकडे सुपूर्त देहू – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी नुकतीच आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. त्यांच्यावर ३२ लाखांच कर्ज होतं. कर्जाचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेला चिठ्ठीत केला होता. ३२ लाखाच्या कर्जाची रक्कम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांच्या…
शिरुर प्रांत कार्यालयातील महिला अव्वल कारकूनाला लाच स्वीकारताना अटक
धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून एक लाख साठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर -शिरुर प्रांत कार्यालयातील लाचखोर महिला अव्वल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.सुजाता मनोहर बडदे असे लाच स्वीकारणाऱ्या महिला अव्वल कारकूनाचे नाव आहे. त्यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम तानाजी श्रीपती मारणे यांनी लाच स्विकारली होती. त्यामुळे खाजगी इसम मारणे व अव्वल कारकून सुजाता बडदे…
धक्कादायक ! आळंदीत सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू
आळंदीतील सर्पमित्र राहुल उर्फ विकास मल्लिकार्जुन स्वामी (वय ३२) यांचा सर्पदंशामुळे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. गावात पकडलेल्या कोब्रा जातीच्या सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी निर्जन स्थळी गेलेल्या स्वामी यांना सापाने दंश केला. दंशानंतर त्यांना तातडीने आळंदी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांचा मृत्यू…
धक्कादायक! वाळूमाफियांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी तहसीलदारांना ३ तास ठेवले बसून वर त्यांचीच गाडी केली जप्त ..
छत्रपती संभाजीनगर शहरात वाळूमाफियावर कारवाई करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तहसीलदार रमेश मुंडलोड यांना पोलिसांची धक्कादायक कारवाई नशिबी आली. तहसीलदारांना पोलीस चौकीत तीन तास बसवून ठेवण्यात आले आणि त्यांचे शासकीय वाहन जप्त करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने महसूल व पोलीस प्रशासनासह राज्यात खळबळ उडाली आहे. तहसीलदारांची गाडी जप्त करण्याचा पहिलाच प्रकार महाराष्ट्रात घडला असावा. या प्रकरणात जिल्हाधिकारी…
शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने ‘होम मिनिस्टर’ खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
महिला आरोग्य शिबीर, व्याख्यान, रोजगार मार्गदर्शन व विविध महिला स्पर्धांचे आयोजन शिक्रापूर (ता.शिरूर) येथे आदर्श सरपंच रमेश गडदे व सर्व ग्राम पंचायत सदस्यांच्या संकल्पनेतून मकर संक्रांतीच्या निमित्ताने आरोग्य शिबिरात महिला भगीनिंच्या आरोग्याची तपासणी व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबीर, व्याख्यान,होम मिनिस्टरयावेळी विजेत्या पाच महिला भगिनींना पैठणी, ओहन, मिक्सर, पंखा, इस्त्री,कुकर अशा बक्षिसांची…
सखे, मला माफ कर, तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग.’ शिरीष महाराजांचे भावी पत्नीसाठी काळीज पिळवटून टाकणारे अखेरचे शब्द
पुणे – माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्नं तोडून जातोय. कुंभमेळा राहिला, वारी राहिला, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं. सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू….
धक्कादायक ! कोरेगाव भीमामध्ये पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा बालविवाह
कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांचे पथक तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी बालविवाह रोखत अल्पवयीन युवतीची होणाऱ्या बालविवाहातून सुटका करत पालकांना समज दिली आहे. कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा तिचे पालक सदर युवती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील ३ फेब्रुवारी…
पुण्यामध्ये राज्य कर निरीक्षक ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
पुणे येथील जी.एस.टी. कार्यालयातील राज्य कर निरीक्षक तुषारकुमार माळी (वय ३३) यांना ५,००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) रंगेहाथ पकडले. तक्रारदार वकिली व्यवसायात असून, एका व्यापारी अशिलाच्या जी.एस.टी. नंबर पुनर्जिवीत करण्यासाठी त्यांनी कार्यालयात तक्रार केली होती. तक्रारीनुसार, तुषारकुमार माळी यांनी कामासाठी ५,००० रुपयांची मागणी केली. पंचासमक्ष पडताळणीनंतर आज येरवडा कार्यालयात लाच स्वीकारताना माळी…
आमदार निरंजन डावखरे प्रतिष्ठाणच्या वतीने सणसवाडीत अडीच कोटींच्या आरोग्य विम्यासह १५०० लाभार्थ्यांना विविध योजनांचा मोफत लाभ
दिनांक ४ फेब्रुवारी – सणसवाडी (ता.शिरूर) आमदार अॅड.निरंजन डावखरे प्रतिष्ठानचे वतीने तसेच भारतीय पोस्ट विभागाच्या वतीने पुढाकाराने आयोजित येथील वीस शासकीय योजनांच्या दोन दिवसीय मोफत शिबीरात तब्बल दिड हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून यामध्ये आधार दुरुस्ती, बाल आधार, ई-श्रम कार्ड तसेच पोस्टाच्या जनरल इन्शुरन्स विम्यासाठी कामगार वर्गाची मोठी गर्दी राहिली. तब्बल अडीच कोटींच्या पोस्टाच्या मेडीक्लेम…
