
Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.

आषाढी वारीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी १ मिनिटात ३२- ३५ वारकऱ्यांना मिळणार विठुरायाचे दर्शन
पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना जलद आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वारीत एका मिनिटात ३२ ते ३५ वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतील असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवण्यासाठी घुसखोरीच्या ठिकाणांवर जाळ्या लावण्यात आल्या आहेत. यावर्षी…

संतापजनक! रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पोटाला जेलऐवजी लावलं ॲसिड; महिला गंभीर जखमी
जालना जिल्ह्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या पोटाला सोनोग्राफी करण्यापूर्वी जेलीऐवजी ॲसिड(किंवा तत्सम दाहक रसायन) लावण्यात आल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने, या घटनेनंतर अर्ध्या तासाने महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून, बाळ सुखरूप आहे. नेमकी काय घडली घटना? खापरखेडा वाडी…

फेसबुकवर 4 दिवसांची मैत्री, चॅटिंग अन् लॉजवर भेट; पण ‘तो’ एक हट्ट नडला अन् विवाहितेची निर्घृण हत्या!
मांड्या, कर्नाटक: सोशल मीडियावरील ओळख किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना कर्नाटकातील मांड्या येथे समोर आली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी फेसबुकवर मित्र झालेल्या एका तरुणाशी चॅटिंग करत लॉजवर भेट झालेल्या व त्याबाबत झालेल्या वादाने विवाहित महिलेची निर्घृण हत्या केली आहे. एकत्र राहण्याच्या हट्टातून हा भयानक गुन्हा घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी…

अवैध गावठी हातभट्टीवर शिरूर पोलिसांची धडक कारवाई
शिरूर (पुणे): पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अवैध गावठी हातभट्टीचा व्यवसाय तेजीत असताना, शिरूर पोलिसांनी २४ जून २०२५ रोजी एका मोठ्या कारवाईत तब्बल १.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत या व्यवसायाला चांगलाच हादरा दिला आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कण्हेरे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या या गावठी हातभट्टीवर…

राज्यातील वीज ग्राहकांसाठी ‘अच्छे दिन’; पहिल्यांदाच पाच वर्षांत दर कमी होणार!
महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी एक ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) महावितरणकडून सादर करण्यात आलेल्या याचिकेवर सकारात्मक निर्णय देत पुढील पाच वर्षांत वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच वीज दर कमी होणार असून, यामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्या वर्षी वीज दरात १०…

आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजयव गांगुर्डे सेवेतून बडतर्फ; २७.५१ कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळात कोट्यावधी रुपयांच्या धान्य खरेदी गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, त्यांच्यावर २७.५१ कोटी रुपयांची वसुली लावण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी हे आदेश दिले आहेत, ज्यामुळे…

धक्कादायक! शिक्षकाची शाळेच्या वर्गातच गळफास घेत आत्महत्या
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका शिक्षकाने शाळेतच आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेत कार्यरत असलेले रवींद्र महाले यांनी शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान दुसऱ्या मजल्यावरील वर्गखोलीत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मधली सुट्टी संपल्यानंतर रवींद्र महाले यांना गळफास…

दोन वेगवेगळ्या चोरीप्रकरणातील सोन्याचे दागिने मूळ मालकांच्या स्वाधीन
शिरूर पोलिसांचे नागरिकांतून कौतुक! शिरूर (जि. पुणे): शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावला आहे. चोरीस गेलेले सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पुन्हा मूळ मालकांना परत करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व त्यांच्या पथकाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. गुन्हा १: एसटी स्थानकाजवळून गळ्यातील…

काळाचा घाला! आई-वडिलांविना कष्टातून आयुष्य फुलवले, पण हृदयविकाराने प्रदीप ढेरंगेंना हिरावले
कोरेगाव भीमावर शोककळा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर कोरेगाव भिमा (ता. शिरूर): आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षाला सामोरे जाऊन, मोठ्या हिमतीने स्वतःचा संसार आणि शेती फुलवलेल्या कोरेगाव भीमा येथील मनमिळावू, कष्टकरी आणि हसतमुख प्रगतशील शेतकरी प्रदीप ढेरंगे (वय अंदाजे ४०-४५ वर्षे) यांचे मध्यरात्री ३ वाजता आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या धक्कादायक बातमीने कोरेगाव भीमा आणि पंचक्रोशीवर…

जुन्नरच्या दुर्गावाडी दरीत तलाठी आणि युवतीचा आढळला मृतदेह
जुन्नर (जिल्हा पुणे): जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या दुर्गावाडी येथील कोकणकड्याच्या सुमारे १२०० फूट खोल दरीत एक तलाठी आणि एका महाविद्यालयीन युवतीचे मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्नरचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी या घटनेची माहिती दिली. मृत व्यक्तींची ओळख आणि बेपत्ता होण्याच्या तक्रारी – मृतांमध्ये रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०), मूळ गाव…