Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.
व्हॉट्सॲपवर औषध सुचवणे डॉक्टरला पडले महागात; रुग्णाचा मृत्यू, ३ लाखांचा दंड
रुग्णाची तपासणी न करता फक्त व्हॉट्सॲपवर औषध सुचवणे एका डॉक्टरसाठी चांगलेच महागात पडले आहे. या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असून, जिल्हा ग्राहक मंचाने डॉक्टर आणि संबंधित रुग्णालयाला ३ लाख रुपये नुकसानभरपाई आणि १५ हजार रुपये तक्रार खर्च देण्याचा आदेश दिला आहे.(A doctor has been found guilty of prescribing medicine on WhatsApp without examining the patient….
श्री क्षेत्र जेजुरी येथे चंपाषष्ठी उत्सवाला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी गडावरील श्री मार्तंड मल्हारी देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची वेदमंत्राच्या घोषात करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करून सोमवारी मोठ्या भक्तिभावाने सुरुवात करण्यात आली. मार्गशीर्ष महिन्यात दिवटी पेटवून कुलधर्म कुलाचार करण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात. सोमवारी (ता. २)सकाळी पाखळणी करण्यात आली. त्यानंतर बालव्दारीमध्ये खंडोबाच्या मूर्तींची स्थापना केली. पानाचे…
दुर्दैवी अंत! २६ व्या वर्षी IPS झाला, नोकरीवर रुजू होण्याच्या दिवशीच प्रवासात गाडीचा टायर फुटल्याने मृत्यू
भयंकर दुर्दैव दुसरे काय असावे, अत्यंत कठोर परिश्रम करत युपीएससी परीक्षा व्हावी, त्यात आय पि एस पोस्ट मिळावी ,ट्रेनिंग पूर्ण होत यावे आणि आनंदाच्या भागात नव्या नोकरीवर रुजू व्हायला प्रवास सुर करावा आणि नियतीने डाव साधावा… अशीच एक हृदयद्रावक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. मध्यप्रदेशातील एक तरुण २६ व्या वर्षी IPS झाला. नोकरीवर रुजू होणार त्याचवेळी…
शिक्रापूरचे माजी उपसरपंच गिलबिले यांच्या हत्येप्रकरणी आरोपीला पोलिसांनी १२ तासांत ठोकल्या बेड्या
शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कोयाळी गावठाण (ता. शिरूर) येथील हिवरे रस्त्यावर रविवारी (ता.१) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दत्तात्रय गिलबिले यांची हत्या पुर्ववैमनस्यातून झाली असून शिक्रापूर पोलिसांनी आरोपी पप्पु नामदेव गिलबिलेला अटक करण्यात आले असून शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या…
मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! नव्या पिढीच्या हक्कांचा आदर करा – शांतीलाल मुथ्था
पुणे– “जैन समाजातील मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुलं वयाच्या २०व्या वर्षी पोहोचल्यावर त्यांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला पाहिजे. मात्र, अट अशीच असेल की जोडीदार आपल्या समाजातीलच असावा,” असे मार्मिक आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले. पुण्यात आयोजित भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात मुथ्था बोलत…
“वयाच्या सहाव्या वर्षी इंदिरा गांधींच्या निषेधापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत फडणवीस यांची प्रेरणादायी यशोगाथा”
इंदिरा गांधींनी आणीबाणीत वडिलांना तुरुंगात टाकले म्हणून मला त्यांच्या नावाच्या शाळेत शिकायचे नाही असे वयाच्या सहाव्या वर्षी सांगत शाळा बदलणारे, वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक, २७ व्या वर्षी महापौर, आणि दोन वेळा मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस यांची उत्तुंग वाटचाल महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आपले वेगळे स्थान निर्माण करणारे नेते, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, हे नाव आज प्रत्येकाच्या…
दौंडमध्ये एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला तर दुसऱ्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दौंड तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भीमा नदीचा पट्टा आणि पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचे वास्तव दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी (दि. १) पहाटे यवत रेल्वे स्टेशनजवळ एका बिबट्याला रेल्वेची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वन्यजीवांसाठी चिंताजनक असून, शेतकरी आणि शेतमजूर भयभीत झाले आहेत. दौंड तालुक्यातील पाटस, वरवंड,…
धक्कादायक ! शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांचा धारदार शस्त्राने केला खून
मानेवर वर्मी घाव, घटना स्थळी व परिसरात शिक्रापूर पोलिसांचा बंदोबस्त शिक्रापूर (ता. शिरूर) येथील माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर अंदाजे ३५ वर्षीय इसमाने धारदार शास्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे शिक्रापूर परिसरात खळबळ उडाली आहे.(A shocking incident has taken place in which a 35-year-old…
भयंकर! घरासमोर विष्ठा केल्याच्या वादात नऊ महिन्याच्या मुलावर कुऱ्हाडीने वार
शेजाऱ्यांमधील वाद विकोपाला, आरोपी फरार बेलापूरमध्ये एका ९ महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळावर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. ९ महिन्यांचा चिमुकला गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही…
धक्कादायक ! वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्या युवतीवर डॉक्टरकडून बलात्काराचा प्रयत्न
एका डॉक्टरने आपल्या रुग्णालयात तपासणीसाठी पेशंट म्हणून आलेल्या एका (21 वर्षीय) युवतीची छेड काढून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात काल दि.२९ रोजी रात्री उशिरापर्यंत संतप्त जमावाने ठिय्या मांडून निवेदन दिले.या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरला तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणाच्या निषेधार्थ व संबंधित डॉक्टरच्या…
