Swarajyatimesnews

मनोज जरांगे पाटलांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना तुकडे तुकडे करण्याची धमकी 

पुणे – जरांगे पाटील यांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना अज्ञाताने मोबाईलवर तुकडे तुकडे करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि. १७ ऑगस्ट २०२४) रात्री दहा वाजेच्या सुमारास ॲड. गणेश म्हस्के घरी जात असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीकरांच्या समस्यांसाठी ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन

मॅरेथॉन मध्ये सहभाग होणाऱ्या सर्वांनी एक रुपया आणण्याचे आवाहन जमा होणारी रक्कम महानगर पालिकेला देणार भेट वाघोली (ता. हवेली) येथील नागरिकांच्या विविध समस्यांमधून सुटका होण्यासाठी रावलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता अभिषेक लॉन्स, वाघेश्वर मंदिराजवळ, पुणे नगर रोड, वाघोली येथून सुरू होणार…

Read More
Swarajyatimesnews

सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांना पूर्ण करत त्यांच्या आयुष्यात आर्थिकस्थैर्य आणण्याचे काम कानिफनाथ पतसंस्थेने केले – विठ्ठलराव ढेरंगे

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) परिसरातील सर्वसामान्य शेतकरी,कामगार व सभासदांच्या अनेक महत्वपूर्ण गरजांना उभे राहत त्यांच्या अनेक स्वप्नांना मूर्त स्वरूप देत त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्यता आणण्याचे महत्त्वपूर्ण काम कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने केले असून मागील ३५ वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली असून संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे प्रतिपादन संस्थापक विठ्ठलराव ढेरंगे यांनी संस्थेच्या ३५ वार्षिक…

Read More
Swarajyatimesnews

 पुणे, नगर रोड घेणार मोकळा श्वास जंबो फ्लाय ओव्हर उभारत ट्रॅफिक जॅम मुक्त करणार – अजित पवार

सणसवाडी येथील जन सन्मान येत्रेत घोषणा सणसवाडी (ता.शिरूर) लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, मुस्लिम , आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जी पाऊले उचलली आहेत.ती पुढील पाच वर्षात ही कायम ठेवणार असून पुढील काही दिवसात पुणे नगर रोड वरील  वाहतूक कोंडी संपवण्यासाठी जंबो फ्लाय ओव्हर करण्याची गॅरंटी देतो असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार…

Read More
Swarajyatimesnews

वढू बुद्रुक येथील महिला भगिनींनी मानले महाराष्ट्र शासनासह मातोश्री समूहाचे आभार…

मातोश्री उद्योग समूहाने जपली सामाजिक बांधिलकी अनेक महिलांना बँक खाते व माझी लाडकी बहिण योजनेचा महिलांना मोठा लाभ वढू (ता. शिरूर) येथील मातोश्री उद्योग समूहाच्या वतीने १०० हुन अधिक महिला भगिनिंना एअरटेल पेमेंटस बॅंक खाते काढून देण्यात आले. त्यासोबत डीबीटी लिन्क करुन मुख्यमंञी लाडकी  बहीण योजनाचे  फॉर्म भरुन देण्यात आला होता व त्याचे पैसे नुकतेच…

Read More
Swarajyatimewsnews

जीव देण्यापूर्वी आई वडिलांचे शेवटचे शब्द आमची मुले आजीकडे राहतील आमचा कोणावरही विश्वास नाही

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या ज्वेलरने पत्नीसह गंगा नदीत घेतली उडी : आत्महत्येपूर्वी घेतला सेल्फी उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका ज्वेलर शॉपच्या मालकाने पत्नीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साई ज्वेलर्सचे सौरभ बब्बर यांनी पत्नीसोबत हरिद्वारच्या गंगा नदीत उडी मारून आपले जीवन संपवले.सौरभ यांच्या चिठ्ठीत मध्ये आम्ही आमच्या कर्जदारांना अंदाधुंद व्याज दिले आहे…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडी येथे निसर्गाच्या सान्निध्यात भरली संस्कार शाळा

बहुभाषिक, विविध प्रांतातील विद्यार्थी एकत्रित शिक्षण घेत जपतायेत राष्ट्रीय एकात्मता सणसवाडी (ता.शिरूर) येथील नरेश्वर विद्यालय, वसेवाडी व सणसवाडी जिल्हा परिषद शाळा या तिनही शाळांच्या ४ हजार विद्यार्थ्यांची एकत्रित संस्कारशाळा येथील नरेश्वर मंदिर पठारावर भरली. भारतीय संस्कृतीचे धडे, पालकांच्या आदराच्या गुजगोष्टी आणि विद्यार्थीदशेतील स्वयंघडवणूकीचे अनेक उपक्रम या संस्कार शाळेत संपन्न झाले. सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्श संस्कारांचे उपक्रम…

Read More
Swarajyatimesnews

अखेर …पिंपळे जगताप ग्रामस्थांचे रस्त्यांसाठी साखळी उपोषण सुरू

पिंपळे जगताप (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील  भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे येथून कामगार,विद्यार्थी,नागरिक व वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे  पिंपळे जगतापचे ग्रामस्थ त्रस्त झाल्याने या त्रासामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र येत साखळी उपोषण सुरू केले असून यात ग्रामस्थांचा मोठा सहभाग दिसत आहे.     जिल्हाधिकारी, पुणे प्रदेश विकास प्राधिकरण, सामाजिक बांधकाम…

Read More
Swarajyatimesnews

रस्ता दुरुस्त करा अन्यथा उपोषण करू पिंपळे जगताप ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ पिंपळे जगताप (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील  भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे येथून. कामगार,विद्यार्थी,नागरिक व वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे  पिंपळे जगतापचे ग्रामस्थ त्रस्त झाल्याने या त्रासामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र येत उपोषण  करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासनाला दिला आहे. जिल्हाधिकारी, पुणे प्रदेश विकास…

Read More
स्वराज्य टाइम्स

शिक्रापूरचे माजी उपसरपंच रमेश थोरात यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

सुधीर ढमढेरे, बबनराव गायकवाड, सचिन पारखे यांच्यावर गुन्हा दाखल शिक्रापूर (ता.शिरूर) येथील माजी उपसरपंच रमेश थोरात यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर ढमढेरे (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे), बबनराव गायकवाड व सचिन पारखे (दोघांचा पत्ता माहिती नाही) या तिघांवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Crime News)…

Read More
error: Content is protected !!