पुण्यातून चोरीला गेलेली फॉर्च्युनर थेट आंध्र प्रदेशात! शिक्रापूर पोलिसांचा पाच दिवसांचा मुक्काम; अखेर माजी सरपंचांचा त्याच गाडीतून परतीचा प्रवास!!
अवघ्या साडेसात मिनिटांत चोरट्यांनी फॉर्च्युनर केली होती लंपास! पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या पाठपुराव्याला यश! उदयकांत ब्राम्हणे कोरेगाव भिमा (ता. शिरूर) अवघ्या साडेसात मिनिटांत फॉर्च्युनर चोरून चोरटे पसार झाले; मात्र वर्षभरानंतर त्याच फॉर्च्युनरचा ठावठिकाणा थेट आंध्र प्रदेशात लागला! कोरेगाव भीमा येथील माजी सरपंच संदीप ढेरंगे यांची चोरीला गेलेली टोयोटा फॉर्च्युनर शोधून…
