हजारो पणत्यांनी उजळला पेशवे घाट; फुलगावच्या ऐतिहासिक वैभवाला दीपोत्सवाची झळाळी!
पाण्यात उमटले हजारो दिव्यांचे मनमोहक प्रतिबिंब; जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे यांच्या माध्यमातून दीपप्रज्वलन, कमानी घाट संवर्धन समितीचा पुढाकार अन् ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग! फुलगाव (ता. हवेली) हजारो पणत्यांचा लखलखता प्रकाश… ऐतिहासिक कमानीचे उजळलेले रूप… पाण्यावर उमटणारी दीपमाळेची मनोहारी प्रतिबिंबे आणि या अद्भुत सोहळ्याचे साक्षीदार झालेले शेकडो ग्रामस्थ… अशा नेत्रदीपक वातावरणात फुलगाव येथील ऐतिहासिक पेशवे घाटावर…
