सणसवाडीत दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा, आपत्ती मित्रांचा सन्मान

Swarajyatimesnews

माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण; सामाजिक कार्यासह शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव

सणसवाडी (ता. शिरूर) : सणसवाडी येथील मयूरनगरच्या दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थी सन्मान समारंभात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसह आपत्ती व्यवस्थापन, बचावकार्य आणि सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. या वेळी माजी आमदार अशोक पवार शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव साहेब महावितरण विभागाचे नितीन महाजन सुजित जाधव साहेब विश्वास काका ढमढेरे दत्तात्रय हरगुडे विजयराज दरेकर संतोष गोसावी सर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

मंडळाच्या वतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या तसेच विविध इयत्तांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा प्राथमिक शाळा, सणसवाडी येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले.

यामध्ये इयत्ता चौथीतील कु. श्रीशा प्रमोद गाडे आणि कु. स्वरूप नितीन राजपुरे, इयत्ता सातवीतील कु. प्रतिक्षा प्रमोद गाडे, कु. माहेश्वरी पंकज राठोड, कु. मृणाली अमर रोमन, कु. दिशा राजेश राव आणि कु. पूजा बाबासाहेब खोडदे, तसेच इयत्ता आठवीतील कु. माने संस्कृती शिवाजी, कु. जाधवर सृष्टी शरद, कु. कदम श्रुती वसंत, कु. अंकुश्री श्रेया अमोल, कु. वाघमारे अर्जुन साईनाथ आणि कु. कांबळे सोनाक्षी महादेव यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी शिरूर तालुका आपदा टीममधील आपत्ती मित्र आणि महिला सर्पमित्रांनी केलेल्या कार्याचाही सन्मान करण्यात आला. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचविणे, विहिरीत पडलेल्या महिलेला जीवदान देणे तसेच नदीच्या कडेला टाकून दिलेल्या नवजात बालकाचे प्राण वाचविणे अशा उल्लेखनीय कामगिरीचा विशेष उल्लेख करण्यात आला. या कार्यासाठी राहुल गायकवाड, श्रीकांत भाडळे, महेश साबळे, शेखरखान शेख, वैभव निकाळजे, गणेश टिळेकर, अमोल कुसाळकर, साहिल मोरे, शुभांगी टिळेकर आणि साक्षी वाघमारे यांचा सन्मान करण्यात आला.

याशिवाय पोलीस हवालदार हेमंत कुंजीर, पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे आणि पोलीस शिपाई शरद धुप्पते यांच्या विशेष कामगिरीचाही गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेण्याचा मंडळाचा हा उपक्रम परिसरात प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमासाठी मंडळाचे संस्थापक पंडित दरेकर, आधारस्तंभ रामदास सोपान दरेकर, अध्यक्ष लक्ष्मण अण्णा दरेकर, उपाध्यक्ष अशोक करडे, नारायण हरगुडे,हनुमंत हरगुडे, पप्पू हरगुडे,गोरख भुजबळ,विठ्ठल दरेकर, बाळकृष्ण दरेकर,संतोष नरके, कार्याध्यक्ष शाम दरेकर, खजिनदार रवीराज जुनावणे, सहकार्याध्यक्ष निलेश नाना दरेकर, उत्सवप्रमुख सुभाष दरेकर, सहखजिनदार सलीमशेठ खान, सचिव नारायण चौधरी, सहसचिव प्रा. डॉ. अनिल गोटे आणि सहउत्सवप्रमुख संतोष शेळके यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!