सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालणाऱ्या Cockroach Janta Party ‘कॉकरोच जनता पार्टी’ला मोठा धक्का बसला आहे. या पार्टीचे अधिकृत ‘X’ (ट्विटर) अकाउंट भारतात अचानक बंद (Ban) करण्यात आले आहे.गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांची तुलना कथितपणे ‘कॉकरोच’शी केल्याचा आरोप झाला होता. सरन्यायाधीशांनी यावर स्पष्टीकरण दिले असले, तरी तरुणांचा संताप शांत झाला नाही. या वक्तव्याचा निषेध म्हणून सोशल मीडियावर Cockroach Janta Party ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाचे पेजेस सुरू झाले.
इन्स्टाग्रामवर भाजपलाही टाकले मागे! – या Cockroach Janta Party डिजिटल पार्टीला तरुणांचा इतका प्रचंड पाठिंबा मिळाला की, गुरुवारी सकाळीच या पेजने फॉलोअर्सच्या बाबतीत थेट भाजपला मागे टाकले. सध्या भाजपच्या इन्स्टाग्रामवर ८७ लाख फॉलोअर्स आहेत, तर या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या पेजने १ कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘X’ वर बंदी आली असली, तरी त्यांचे इन्स्टाग्राम पेज अजूनही सुरू आहे.
https://www.instagram.com/reel/DYl5xiytTH3/?igsh=NWY5aGVzdjk1ZWY=

आधी हॅक करण्याचा प्रयत्न केला, मग बॅन केले” : अभिजीत दीपके संतप्त –
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ अकाउंट काढणारे अभिजीत दीपके, हे अकाउंट बंद झाल्यामुळे संतप्त झाले आहेत. Cockroach Janta Party हे सोशल मीडिया अकाउंट चालवणारे अभिजीत दीपके यांनी अकाउंट बंद झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी सांगितले, “ज्याची भीती होती तेच घडले. आधी त्यांनी आमचे अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात अपयश आल्यावर थेट बॅन केले.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही फक्त सरकारला प्रश्न विचारत होतो, काहीही चुकीचे लिहिले नव्हते. तरीही आमचे खाते बंद करण्यात आले. ही कसली लोकशाही आहे? या अन्यायाविरोधात तरुणांनी आवाज उठवला पाहिजे.”
सध्या हा विषय सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत असून, ‘X’ च्या या कारवाईमुळे तरुण वर्गात अधिकच संताप पाहायला मिळत आहे.’X’ वरून खाते हटवले तरी इन्स्टाग्रामवरील

https://www.instagram.com/reel/DYl5xiytTH3/
या व्हिडिओ रीलला लाखो व्ह्यूज मिळत आहेत. तरुणांमधील वाढत्या बेरोजगारीचा आणि रोषाचा हा डिजिटल चेहरा आता राजकीय वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘X’ कडून हे अकाउंट पुन्हा बहाल केले जाते की हा वाद न्यायालयात पोहोचतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
