दुष्काळात सर्वांना मदतीचा ज्यांनी दिला मदतीचा हात त्या पवार कुटुंबियांना पाबळ गणाची खंबीर साथ

Swarajyatimesnews

 वंदना प्रकाश पवार यांना पाबळ गणातून उत्स्फूर्त पाठिंबा; दुष्काळातील माणुसकीची निवडणुकीत ‘जाणीव’

पाबळ (ता. शिरूर)  राजकारणात सत्ता येते आणि जाते, पण समाजकारणात जो जनसेवेचा वसा जपत माणुसकीचे नाती जपतो, त्यालाच जनता डोक्यावर घेते, याचा प्रत्यय सध्या पाबळ गणात येत आहे. नैसर्गिक आपत्ती असो वा भीषण दुष्काळ, पदरचे पैसे खर्च करून टँकरद्वारे तहान भागवणाऱ्या पवार कुटुंबाच्या सामाजिक ऋणाची परतफेड करण्याचा निर्धार पाबळसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला आहे. आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सौ. वंदना प्रकाश पवार यांना मिळत असलेला जनसामान्यांचा कौल पाहता, हा पवारांचा बालेकिल्ला अधिकच अभेद्य झाल्याचे चित्र दिसत आहे.

संकटातील ‘धावून’ येणारे नेतृत्व – पाबळ आणि परिसरातील वाड्या-वस्त्यांवर जेव्हा जेव्हा दुष्काळाचे चटके जाणवले, तेव्हा शासकीय मदतीची वाट न पाहता माजी सभापती प्रकाश बापू पवार आणि सदाशिव पवार हे स्वतः जमिनीवर उतरले. “आमच्या घराची चूल पेटली नसली तरी चालेल, पण पाबळची तहान भागली पाहिजे,” या भूमिकेतून त्यांनी स्वखर्चाने टँकरची व्यवस्था केली होती. आज निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामस्थ याच कृतज्ञतेच्या भावनेतून वंदना प्रकाश पवार आणि प्रफुल्ल शिवले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.

विकासाचा ‘कॉंक्रिट’ वारसा : केवळ आश्वासने न देता, निधी खेचून आणण्याची धमक पवार कुटुंबाने दाखवली आहे. त्याची फलश्रुती आज गावागावात दिसत आहे:

सिमेंट काँक्रिट रस्ते : पाबळ गावठाणासह धामारी, जातेगाव, मुखई, हिवरे आणि खैरेनगरमधील वाड्या-वस्त्या आता सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्यांनी जोडल्या गेल्या आहेत.

 ऊर्जा आणि आरोग्य:माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या सहकार्यातून उभारलेले वीज उपकेंद्र आणि भव्य आरोग्य उपकेंद्र या भागासाठी संजीवनी ठरले आहे.

जलसमृद्धी: थिटेवाडी बंधाऱ्याच्या माध्यमातून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात पवारांचा सिंहाचा वाटा आहे.

“ही निवडणूक विश्वासाची!” – “आमच्या सुख-दुःखात जो धावून येतो, तोच आमचा खरा लोकप्रतिनिधी,” अशा भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. प्रकाश पवार व सदाशिव पवारांच्या कार्याचा वारसा पुढे नेत असताना, वंदना पवार यांनीही प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा शब्द दिला आहे. महिलांचा वाढता सहभाग आणि तरुणांचा उत्साह पाहता, विरोधकांचे धाबे दणाणले असून या पंचायत समिती गणामध्ये पवार कुटुंबाचे पारडे जड झाले आहे.

“आम्ही राजकारण सत्तेसाठी नाही, तर सेवेसाठी करतो. पाबळम गणातील प्रत्येक नागरिकाचा विश्वास आमच्यासाठी आशीर्वाद आहे.” —  वंदना प्रकाश पवार (उमेदवार, पंचायत समिती)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!