किरण साकोरे, मोनिका कंद आणि राणी वाळके यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोणीकंद (ता.हवेली): पुणे जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा धडाका लावत मोठी आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार पै. किरण संपत साकोरे, लोणीकंद पंचायत समितीच्या उमेदवार मोनिका श्रीकांत कंद आणि पेरणे पंचायत समितीच्या उमेदवार स्वाती दत्तात्रय वाळके यांच्या पदयात्रा आणि कोपरा सभांना मतदारांकडून मिळणारा सकारात्मक’ प्रतिसाद पाहता, या गटात कमळ फुलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गावंच्या गावे भाजपमय; जनसंपर्काचा प्रभाव : भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद आणि कुस्तीगीर संघाचे पै. संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली आखलेली प्रचाराची रणनीती यशस्वी ठरताना दिसत आहे. उमेदवारांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला असून, प्रत्येक गावात त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे.

पै. किरण साकोरे यांच्या रूपाने तरुणांना एक हक्काचा चेहरा मिळाला असून, नम्र, आलेल्या मायबाप जनतेच्या पायावर नतमस्तक होऊन विकास कामे करणारा, शब्द तत्काळ पूर्ण करणारा, विकासाचा दृष्टिकोन आणि तत्काळ कामे पूर्ण करणाऱ्या साकोरे यांच्या प्रचारात युवकांनी पदयात्रेत मोठी गर्दी करत साकोरे यांच्या विजयाचा निर्धार केला आहे.

मोनिका श्रीकांत कंद यांच्या सरपंचपदाचा दांडगा अनुभव आणि लोणीकंद परिसरातील कामांची शिदोरी मतदारांना आकर्षित करत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद यांनी केलेली विकासकामे, जोडलेली माणसे आणि त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांचे परेड चांगलेच जड आहे.

राणी दत्तात्रय वाळके यांच्या प्रचारात महिला भगिनींचा मोठा सहभाग असून, पेरणे भागात त्यांच्या नावाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.
प्रचारात आघाडी घेत असतानाच भाजपने विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे. तीर्थयात्रा, आरोग्य शिबिरे , विकास कामे व तरुणांच्या रोजगारासाठी किरण साकोरे यांनी केलेले प्रयत्न आज मतदारांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. भाजपचे उमेदवार मात्र मतदारांच्या मनाचा कौल घेण्यात यशस्वी ठरले आहेत.

पेरणे-लोणीकंद गटातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना शुभाशीर्वाद दिले आहेत. “यावेळी आम्हाला विकासाभिमुख आणि तरुण नेतृत्व हवे आहे,” अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्या आहेत. मतदारांचा हा सकारात्मक कल पाहता, भाजपने या गटात आपले वर्चस्व चांगलेच निर्माण केल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
