विद्यार्थ्यांचे सुसंस्कृत व उज्वल भविष्य घडविण्यासाठी सदैव कटिबद्ध – मनीषा गडदे 

Swarajyatimesnews

कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रश्न संचाचे वाटप

शिक्रापूर  (प्रतिनिधी ) राष्ट्राची खरी संपत्ती स्वाभिमानी व सुसंस्कृत नागरिक असून समृद्ध भारत घडवायचा असेल शिक्षण व संस्कार दर्जेदार व्हायला हवेत यासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा.कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांचे सुसंस्कृत व उज्वल भविष्य घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कर्तव्य फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेच्या अध्यक्षा मनीषा गडदे यांनी व्यक्त केले.(Shikrapur (Representative) The true wealth of the nation is self-respecting and cultured citizens. If we want to build a prosperous India, society should take the initiative to ensure that education and culture are of high quality. Manisha Gadde, president of Kartavya Foundation, a social service organization, expressed her commitment to creating a cultured and bright future for the students on behalf of Kartavya Foundation.)

कर्तव्य फौंडेशनच्या वतीने शिक्रापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा स्तरावर नेत्रदीपक यश मिळवावे यासाठी कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने शाळेतील विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना  “लक्षवेधी ” प्रश्न संचाचे वाटप करण्यात आले .शिष्य वृती परिक्षेत मुलाच्या ज्ञानात भर पडावी व नेत्रदीपक यश मिळावे  हा सदहेतू व प्रामाणिक उद्देश आहे.

 यावेळी कर्तव्य फौंडेशनच्या संस्थापिका/अध्यक्षा मनिषा गडदे, तज्ञ संचालक नवनाथ सासवडे, फौंडेशनचे अकुंश घारे, शिक्षण कमिटीचे अध्यक्ष सन्नी जाधव, सदस्य संतोष काळे, मुख्यध्यापिका साधना बेद्रे ,उद्योजक  हार्दीक गडदे, पप्पू कुरे , पत्रकार निलेश जगताप, महमद भाई तोंबोळी , ज्येष्ठ पत्रकार व फौंडेशनचे सदस्य राजाराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!