श्री गजानन महाराज पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा

Swarajyatimesnews

शिक्रापूर (ता.शिरुर) येथील श्री गजानन महाराज मंदिर, राऊतवाडी येथे श्री गजानन महाराजांच्या 115 व्या पुण्यतिथीचे आयोजन भक्तिमय वातावरणात  करण्यात आले. भजन, आकर्षक रांगोळी, अन्नप्रसाद यामुळे मोठ्या भक्तिमय वातावरण पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

या धार्मिक कार्यक्रमात दर्शन, भजन व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. यावेळी शिक्रापूर ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच  रमेश गडदे, ग्राम पंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन, मंदिर समितीचे अध्यक्ष अभिषेक राऊत यांच्यासह गावातील मान्यवर व मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.

रविंद्र बाविस्कर  यांनी शब्दपुष्प अर्पण केले तर महिला भगिनींनी केलेल्या भजनांनी वातावरण भारावून गेले. संदीप खर्चे यांनी साकारलेली रांगोळी विशेष आकर्षण ठरली.

कार्यक्रमासाठी सर्व सेवेकरी, देणगीदार व भक्त यांचे सहकार्य लाभले. मान्यवरांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल मंडळाचे कौतुक केले. यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष हरिभाऊ गंगाराम राऊत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अभिषेक राऊत यांनी वढू येथील माहेर संस्थेला मदत करत सामाजिक बांधिलकी जपली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!