Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
सरपंच रमेश गडदे यांच्या प्रयत्नांनी शिक्रापूर येथे २४ तासांच्या आत बसवली डी.पि.
शिक्रापूर (ता.शिरूर) येथे रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारील डी.पि. जळाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय पाहता आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी एम एस सी बीच्या सहकार्याने अवघ्या चोवीस तासात डी पि बसल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत आभार मानले. शिक्रापूर येथील मोठी नागरी लोकसंख्या आलेल्या नागरी वस्तीची डी पि.जळाल्याने नागरिकांनी आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्याशी संपर्क साधला असता…
वाडा पुनर्वसन येथे ९६ वर्षांच्या आजीने १४ व्यांदा विधानसभेला केले मतदान
मुलगा व नातू अशा तीन पिढ्यांनी बजावला मतदानाचा हक्क कोरेगाव भीमा – वाडा पुनर्वसन(ता. शिरूर) येथील ९६ वर्षांच्या आजीने व्हील चेअरवर बसून मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क बजावला असून इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले. वृद्ध आजी मतदानाला आल्याचे पाहून मतदारांना आनंद वाटला व मतदान करण्याची प्रेरणा मिळाली.यावेळी ९६ वर्षांच्या आजिसह, मुलगा व नातू यांनी…
गुजरात येथील बुद्धिबळ स्पर्धेत दत्तात्रय ठाकूर यांना कांस्य पदक
बारामती – गुजरात मधील बडोदा येथे नुकत्याच झालेल्या ४६ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा मंडळ स्पर्धेत महावितरणचे बारामती येथील उपव्यवस्थापक (वि. व ले.) दत्तात्रय ठाकूर यांना कांस्य पदक मिळाले आहे. या स्पर्धेत देशभरातील वीज क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत ठाकूर यांना कांस्य पदक पटकावण्यात यश मिळाले असून त्यांनी यापूर्वीही…
श्री छञपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नेत्रदीपक दिपोस्तव मोठ्या उत्साहात साजरा
श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथे आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य दीपोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी भक्तीचा,चैतन्याचा, त्यागाचा,शौर्याचा व बलिदानाचा एक एक दिवा लावण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील अनेक गावातील शंभूभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवप्रतिष्ठान…
महायुतीची वज्रमूठ: अर्ज माघारीनंतर ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके विरुद्ध ॲड.अशोक पवार मुख्य लढत
माऊली कटके यांच्या प्रचारासाठी व विजयासाठी पूर्ण ताकदीने उतरून महायुतीसाठी काम करणार – प्रदीप कंद शिरूर, ता. ४ ऑक्टोंबर शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे राजकीय पटलावर अविश्वसनीय घडामोडी घडल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या ठोस प्रयत्नांमुळे महायुतीच्या गोटात एकजुट निर्माण झाली आहे. ४ ऑक्टोंबर रोजी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपचे प्रमुख दावेदार प्रदीप कंद…
शासकीय कामांमध्ये लाच देणे-घेणे गुन्हा – उपअधीक्षक प्रसाद लोणारी
लाचलुचपत प्रतिबंधासाठी जनजागृती उपक्रम शिरूर– “कोणत्याही शासकीय कामांसाठी लाच देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक व्हावे,” असे प्रतिपादन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रसाद लोणारी यांनी केले. शिरूर येथे आयोजित जनजागृती उपक्रमात त्यांनी हे विचार मांडले.या जनजागृती उपक्रमाचे आयोजन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या उपक्रमादरम्यान…
संभाजीनगर: पोलिस उपायुक्तांच्या मुलाची आत्महत्या, आरशावर लिहिलेल्या ओळींनी वाढवले गूढ
संभाजीनगरमध्ये रविवारी धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिस उपायुक्त शीलवंद नांदेडकर यांचा १७ वर्षीय मुलगा साहिल नांदेडकरने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. साहिलची आत्महत्या का झाली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी त्याने आपल्या बेडरूममधील ड्रेसिंग टेबलच्या आरशावर लिहिलेल्या काही ओळींनी या घटनेचे गूढ आणखी वाढवले आहे. रात्री…
सणसवाडी येथे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते २० लाखांच्या रस्त्याचे भूमिपूजन
सणसवाडी (ता. शिरूर) येथील डोंगरवस्ती-पिंपळे जगताप रोड या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. स्थानिक नागरिकांची मागणी आणि परिसरातील रहदारीच्या सोयीसाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. आमदार अशोक पवार यांनी , “सणसवाडीत आजवर अनेक विकास कामे करण्यात…
महावितरणकडून महात्मा गांधी जयंती स्वच्छता उपक्रमाद्वारे साजरी
सोलापूर जिल्ह्यातील सर्व कार्यालयांत महावितरणची स्वच्छता सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान २०२४ अंतर्गत, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला. याच उपक्रमांतर्गत महावितरणने सोलापूर जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला. महावितरणच्या सोलापूर जिल्ह्यात एक मंडल, ५ विभाग, २६ उपविभाग, आणि १२५ शाखा कार्यालये आहेत. बारामती…
बेकर्ट कंपनीच्या पंचनाम्यातून ११ वाहने गायब! पंचनामा पुन्हा करण्याची ग्रामस्थांची मागणी
सरपंच-उपसरपंच, तक्रारदार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुन्हा पंचनामा करण्याचे निवेदन शिरूर तहसिलदार , पुणे जिल्हाधिकारी व पोलीस यांना लवरच दिले जाणार असल्याचे अॅड.विजयराज दरेकर व सागर दरेकर यांनी सांगितले. सणसवाडी (ता.शिरूर) येथील इस्पात कंपनीच्या आवारातील ग्रॉझ बेकर्ट कार्डिंग कंपनीच्या हद्दीत मंगळवारी केलेल्या पंचनाम्यात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. डायनामाईटसारख्या घातक स्फोटकांचा वापर करून बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले…
