
Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.

‘कशापायी हट्ट केलास बाळा? लेकीला काय सांगू, मी एकटी कशी जाऊ गावाला?’ – वारीत नातू गमावलेल्या आजीच्या हुंदक्यांनी पंढरीची वाटही हेलावली!
सराटी (ता.इंदापूर) विठुरायाच्या भेटीच्या ओढीने निघालेल्या पंढरपूर वारीत एका २० वर्षांच्या तरुणाचा नीरा नदीच्या पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील (जिल्हा जालना) झिरपी गावातील गोविंद कल्याण फोके असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, यंदाची त्याची पहिलीच वारी आयुष्यातील शेवटची ठरली. मंगळवारी पहाटे सराटीजवळ नीरा नदीत घडलेल्या या घटनेने वारी…

Protected: शिक्रापूर येथे प्राचार्य सोनबापू गद्रे व विलास कांबळे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
There is no excerpt because this is a protected post.

वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावत लुटले
दौंड (पुणे): आषाढी वारीच्या भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. चहासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले, तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ३० जून रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार,…

५३ वर्षांनंतर कोरेगाव भिमा येथील नरेश्वर तलावाचे खोलीकरण: गावकऱ्यांच्या एकीने साधला ‘तिहेरी विकास’
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे महाराष्ट्रातील सर्वात भीषण ठरलेल्या १९७२ च्या दुष्काळात खोदलेल्या तलावातील गाळ काढण्यासाठी व खोलीकरणासाठी ५३ वर्षांनंतर एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे! “गावच्या सर्वांगीण विकासात एकी, गावच्याप्रति विकास कामात नेकी आणि आणखी बराच विकास बाकी” असा दृढ निश्चय करत कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी नरेश्वर मंदिरामागे असलेल्या जल तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी…

नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले सोमय मुंडे पुण्याचे नवे पोलिस उपआयुक्त
पुणे:राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आणि नक्षलवादी विरोधी कारवायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची पुणे शहर पोलिस दलात उपायुक्त (DCP) म्हणून बदली झाली आहे. लातूरचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांची मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली होती, मात्र अवघ्या एका महिन्यात त्यांची पुन्हा बदली होऊन ते थेट पुणे शहरात…

धक्कादायक! पुण्यातील भोंदूबाबा ‘स्पायवेअर’च्या माध्यमातून भक्तांचे खासगी क्षण रेकॉर्ड करून अश्लील कृत्यांना करायला करत होता प्रवृत्त
पुणे: बावधन पोलिसांनी एका भोंदूबाबाला अटक करून अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला एक अत्यंत धक्कादायक आणि अमानवी सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. हा बाबा भक्तांच्या मोबाईलमध्ये गुपचूप स्पायवेअर ॲप (Spyware App) डाऊनलोड करून त्यांच्या खासगी आयुष्यावर थेट मोबाईल कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवत होता आणि त्यांचे खाजगी क्षण चित्रीत करत होता. प्रसाद उर्फ भीमराव तामदार (वय २९, रा….

आषाढी वारीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी १ मिनिटात ३२- ३५ वारकऱ्यांना मिळणार विठुरायाचे दर्शन
पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना जलद आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वारीत एका मिनिटात ३२ ते ३५ वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतील असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवण्यासाठी घुसखोरीच्या ठिकाणांवर जाळ्या लावण्यात आल्या आहेत. यावर्षी…

संतापजनक! रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पोटाला जेलऐवजी लावलं ॲसिड; महिला गंभीर जखमी
जालना जिल्ह्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या पोटाला सोनोग्राफी करण्यापूर्वी जेलीऐवजी ॲसिड(किंवा तत्सम दाहक रसायन) लावण्यात आल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने, या घटनेनंतर अर्ध्या तासाने महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून, बाळ सुखरूप आहे. नेमकी काय घडली घटना? खापरखेडा वाडी…

फेसबुकवर 4 दिवसांची मैत्री, चॅटिंग अन् लॉजवर भेट; पण ‘तो’ एक हट्ट नडला अन् विवाहितेची निर्घृण हत्या!
मांड्या, कर्नाटक: सोशल मीडियावरील ओळख किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना कर्नाटकातील मांड्या येथे समोर आली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी फेसबुकवर मित्र झालेल्या एका तरुणाशी चॅटिंग करत लॉजवर भेट झालेल्या व त्याबाबत झालेल्या वादाने विवाहित महिलेची निर्घृण हत्या केली आहे. एकत्र राहण्याच्या हट्टातून हा भयानक गुन्हा घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी…

अवैध गावठी हातभट्टीवर शिरूर पोलिसांची धडक कारवाई
शिरूर (पुणे): पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अवैध गावठी हातभट्टीचा व्यवसाय तेजीत असताना, शिरूर पोलिसांनी २४ जून २०२५ रोजी एका मोठ्या कारवाईत तब्बल १.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत या व्यवसायाला चांगलाच हादरा दिला आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कण्हेरे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या या गावठी हातभट्टीवर…