Category: Latest Update
पुणे जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना लाच प्रकरणी रंगेहाथ अटक
एका बॅगेत आढळले ८,५८,४००/- रुपये त्याबाबत तपास सुरू पुणे जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांसह उप अभियंता व कनिष्ठ अभियंता हे तिघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ सापडले असून त्यांना लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आले आहे.ACB ने ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मध्ये बाबुराव कृष्णा पवार, वय…
सक्षम महिला हीच सुदृढ व विकसित कुटुंबाचा पाया असून स्त्रियांच्या सन्मानातच समाजाची प्रगती आहे – आदर्श सरपंच रमेश गडदे
शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने किशोरवयीन मुलींना सायबर सुरक्षा आणि आरोग्य विषयावर मार्गदर्शन, सॅनिटरी नॅपकीन वाटप, सॅनिटरी नॅपकिन डिसपोजल मशीन व महिलांसाठी स्वच्छतागृह अशा उपक्रमांनी आदर्श महिला दीन साजरा शिक्रापूर ( ता.शिरूर) येथील आधुनिक युगात सक्षम महिला हीच सुदृढ व विकसित कुटुंबाचा पाया असून महिलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करून देणे तेथे त्यांना सुरक्षित वातावरण देणे…
त्याच्या बोलण्यावरून पोलिसांना संशय आला अन् राष्ट्रगीत म्हणायला लावलं; बांगलादेशी नागरिकास अटक
अंधेरीच्या गावदेवी डोंगर परिसरात एक माणूस आपली ओळख लपवून राहत होता. अल्ताफ खान असं त्याचं नाव होतं. अल्ताफ खान ( वय २४ वर्ष) मुळचा बांगलादेशातील होता पण भारतात तो अवैधरित्या राहत होता. एके दिवशी पोलिसांना त्याच्या वागण्यावरून संशय आला. त्याची भाषा पश्चिम बंगालमधील लोकांपेक्षा थोडी वेगळी होती. जेव्हा पोलिसांनी त्याला चौकशीसाठी थांबवलं तेव्हा तो घाबरला…
बीजेएस महाविद्यालयात महिला दिनानिमित्त वीरमाता, वीरपत्नीसह विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
वाघोली ( ता.हवेली) महिलांनी आपल्यातील क्षमतांचा शोध घेऊन सक्षम करियर घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिले पाहिजे. महिला ह्या कुटुंबांचा केंद्रबिंदू असून त्या कुटुंबाला एकत्रित गुंफण्याचे काम करत असतात.महिला ही कुटुंबात आई,बहिण, मुलगी ,पत्नी अशा नात्यांच्या भूमिकेतून जात असताना ती सर्व वेळी कुटुंबाच्या संसाराचा गडा अविरतपणे चालवता असते त्यामुळे तिच्या स्त्री सन्मानाची जबाबदारी ही प्रत्येकाने घेतली…
एक तर तू झोप, नाहीतर जावेला पाठव, संबधास नकार दिल्याने १९ वर्षीय नराधमाने महिलेवर केले कटरने वार, २८० टाके
महिलेवर सव्वादोन फुटांचा एक वार तर ऑपरेशन साठी २२ हजारांचा लागला दोरा छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना रविवारी घडली होती. भावकीतीलच ३६ वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या वर्षांच्या तरुणाने नकारानंतर तिच्या अंगावरती कटरने वार केले.यामुळे महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या अंगावर एक वार सव्वादोन फुटाचा असून शरीरावर ठीकठीकानी वार झालेले असून गोधडी शिवल्यागत डॉक्टरांनी…
“त्या औरंग्याने माझ्या राजासमोर भिक मागितली! उदात्तीकरण काय करतो?” – आमदार महेश लांडगे
हाल हाल करून मारला आमचा छावा… औरंग्याच्या औलादीला माफी मागायला लावा मुंबई – मुघल सम्राट औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून महाराष्ट्र विधानसभेत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. औरंगजेबने माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समोर इस्लाम स्वीकारण्यासाठी भिक मागितली होती. त्या औरंग्याचे उदात्तीकरण काय करतो? महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आमदार अबु आझमी सारख्या…
पिंपरीत मंडलाधिकाऱ्याला ४ लाखांची लाच घेताना पकडले रंगेहाथ
पिंपरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव (वय ५६) यांना ४ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदाराने वाल्हेकरवाडी येथे बंगला बांधल्यानंतर सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी जाधव यांनी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली असता, जाधव यांनी तडजोडीनंतर ४.५० लाख रुपयांची…
श्री काळभैरवनाथ महाराजांच्या चरणी माजी आमदार अशोक पवार नतमस्तक
सणसवाडी ( ता.शिरूर) येथे ग्राम दैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या मंदिराचा १३ व्या वर्धापन दिनानिमित्त माजी आमदार अशोक पवार यांनी दर्शन घेतले. शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी सणसवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे धार्मिक कार्यात सहभाग घेतला. श्री काळभैरवनाथ महाराजांच्या चरणी माजी आमदार अशोक…
दुष्काळाला हरवणारा महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार म्हणजे! पाणीदार केंदूर – अमेरिकेतील वॉटर फॉर पीपल सीईओ मार्क डूये
दिनांक २ मार्च केंदूर (ता. शिरूर) येथील जलआत्मनिर्भरतेसाठी सुरू असलेल्या पाणी पुनर्भरणाच्या प्रकल्पात चार वर्षांपूर्वी जलआरेखन करून गावातील जलस्त्रोत, जुने पाझर तलाव व तत्सम माहिती संकलित करणारे जलतज्ञ डॉ. सुमंत पांडे यांच्या टीमने गावाचा जलआराखडा तयार केला. या आराखड्यानुसार ३५०० हेक्टर परिसरातील जलस्तर सुधारून गावाला स्वावलंबी बनवण्याची दिशा आखली गेली.अनाई यातून महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार घडला…
श्री शंभूछत्रपतींच्या समाधीस्थळावर रक्ताभिषेक रक्तदान महायज्ञामध्ये ५५८९ शंभूभक्तांनी केले रक्तदान
कोरेगाव भीमा दि. २ मार्च वढू बुद्रुक (ता.शिरूर) भारताला गौरवास्पद व अभिमान वाटेल असे जागतिक दर्जाचे शंभू छत्रपतींचे स्मारक वढू – तुळापुर येथे साकारत असताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञामध्ये पाच हजारापेक्षा जास्त शंभू भक्तांनी रक्तदान करून शंभू छत्रपतींच्या समाधीवर खऱ्या अर्थाने रक्ताभिषेक करण्यात आला असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी…
