Category: Latest Update
कोरेगाव भीमा येथील गफूरभाई इनामदार यांचे अल्पशा आजाराने निधन
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील गफूरभाई इनामदार (वय ८० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचा गावातील विविध सामाजिक व धार्मिक क्षेत्रात नेहमी सहभाग असायचा. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य समीर इनामदार, व शकील इनामदार यांचे वडील तर उद्योजक अमीर इनामदार, माजी ग्राम पंचायत सदस्य सिराज इनामदार यांचे बंधू तर डॉ.अझर इनामदार यांचे चुलते,…
सिद्धटेक येथे तुकोबारायांच्या वैकुंठगमन सोहळ्याला.. भीमातीरी जणू अवतरली देहूनगरी…
सिद्धटेक (ता. कर्जत) येथे ज्ञानोबा माऊली..तुकाराम या जयघोषात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्याचे आयोजन सिद्धटेक (ता. कर्जत) येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. हा सोहळा संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीतील संदेश आणि भक्तीचा गौरव करणाऱ्या सोहळ्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, संगीत गाथा पारायण आणि दिंडी सोहळा यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांनी परिसर…
MPSC शेतकऱ्याची पोरगी पहिल्याच प्रयत्नात झाली न्यायाधीश… ऋचा विठ्ठल कुलकर्णी राज्यात पहिली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) न्यायाधीश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, बीड जिल्ह्यातील ऋचा विठ्ठल कुलकर्णी यांनी पहिल्याच प्रयत्नात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले असून, न्यायाधीश होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ॲड गणेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली. त्यांच्या या यशामागे त्यांच्या आई-वडील, आजी आणि कुटुंबियांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले असून शेतकऱ्याच्या मुलीने आलेल्या…
कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने शिक्रापूर येथील वाचनालयास पुस्तक संच भेट
तुषार आळंदीकर यांच्याकडून सलग पाच वर्ष स्वखर्चाने वाचनालयास दहा सभासद देण्याचा स्तुत्य उपक्रम शिक्रापूर (ता.शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्त्या व कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा रमेश गडदे यांनी स्वखर्चाने शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालयास एक पुस्तक संच भेट दिला आहे. ग्रंथपाल संतोष काळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिक्रापूर वाचनालयास स्वखर्चाने दहा सभासद दिले असून गेली पाच वर्ष अखंडपणे…
तळेगाव ढमढेरे येथे चौथ्या मजल्यावरुन उडी मारून विवाहितेची आत्महत्या..
लग्नाला झाले होते अवघे तीन महिने तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पती व सासूच्या वादातून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोर्णिमा गणेश धोत्रे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, पती गणेश तानाजी धोत्रे, सासू मंगल तानाजी धोत्रे व नणंद सोनाली लखन यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…
जिल्हा परिषद शाळा नरेश्वरवस्ती येथे सी एस आर फंडातून बेंच,खुर्च्या व संगणक भेट
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेस सेवा कंपनीकडून सी एस आर फंडातून २५ बेंच, २० खुर्च्या व एक संगणक भेट देण्यात आला. याबाबत शालेय समितीचे अध्यक्ष दिपक ढेरंगे व माजी सरपंच अमोल गव्हाणे यांनी सेवा कंपनी व अधिकाऱ्यांशी संवाद साधत शाळेस मदत मिळवून दिली. यावेळी सेको कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट प्रोडक्ट ऑफर आणि इनोव्हेशन…
छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनी घेतले दर्शन
वढू बुद्रुक ( ता.शिरूर) येथील श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे,कवी कलश समाधी व गोविंद गोपाळ यांचे दर्शन महाराष्ट्र विधान सभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी घेतले. यावेळी वढू बुद्रुक ग्राम पंचायतीचे सरपंच माऊली भंडारे, कोरेगाव भीमाचे सरपंच संदिप ढेरंगे, माजी सरपंच अंकुश शिवले,विजय गव्हाणे, माजी उपसरपंच रमाकांत शिवले,संतोष शिवले, लाला तांबे, ग्राम पंचायत सदस्य…
नियोसिम इंडस्ट्री लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत शिक्रापूर पी.एम.श्री. जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक साहित्याचे वितरण
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पी.एम.श्री. जिल्हा परिषद शाळेत नियोसिम इंडस्ट्री लिमिटेड, सणसवाडीच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात एच.आर. ऍडव्होकेट स्वप्निल जठार आणि त्यांच्या सीएसआर फंड विभागातील सहकारी डॉ. श्रीकृष्ण खडे, राहुल सोनार, सुनील मुंडलिक, अजित सिंग यांनी सहभाग घेतला. शाळेला पॅनल बोर्ड, लायब्ररी स्टँड, नोटीस बोर्ड इत्यादी शैक्षणिक…
छंद व कला म्हणजे मानवी जीवनाला सोने बनविणारा परिस – माधव राजगुरू
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) — “मानवी जीवनात जोपासले जाणारे छंद व अंगभूत कला या खऱ्या अर्थाने परिसाप्रमाणे आहेत. त्यांचा उपयोग करून आपण अर्थपूर्ण जीवन जगू शकतो,” असे मत अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था पुणेचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी व्यक्त केले. ते संस्थेच्या शिरूर शाखेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शिरूर…
पत्रकार विजय लोखंडे यांचा राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची ध्येय एज्युकेशन फाउंडेशनने घेतली दखल ‘Ideal Journalist’ award याप्रसंगी हडपसरचे आमदार चेतन तुपे,फाउंडेशनचे संस्थापक सुदाम शेंडगे,राज्य मार्गदर्शक सोमनाथ शिंदे,सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे,योजना संचालनालयचे संचालक डॉ.महेश पालकर,पालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भंगे,ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे,सचिव सोनाली गाडे,राज्यप्रमुख संदीप पाटील,सारिका शिंदे,उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विजय लोखंडे यांनी गेल्या १८…
