Category: स्थानिक वार्ता
कलेक्टर ते ग्रामपंचायत… सर्वांची ताकद फळाला! कोरेगाव भिमा-पेरणे बंधाऱ्याचे काम अखेर युद्धपातळीवर सुरू
कोरेगाव भिमा (ता. शिरूर): गेल्या काही महिन्यांपासून चिंतेत असलेल्या कोरेगाव भिमा परिसरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटल्याने निर्माण झालेला पाण्याचा गंभीर प्रश्न आता मार्गी लागणार असून, बंधाऱ्याच्या ‘की-वॉल’ (संरक्षक भिंत) बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पाठपुराव्याला यश; पाणीप्रश्न सुटणार – सुमारे ३७ वर्षांपूर्वी बांधलेल्या या…
तळेगाव ढमढेरेत बिबट्या जेरबंद; वनविभागाची तत्पर कारवाई, नागरिकांना दिलासा
प्रतिनिधी राजाराम गायकवाड तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जगताप वस्ती व चौधरी वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. या बिबट्याने काही ठिकाणी पशुधनावर हल्ले केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर शिरूर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक मादी बिबट्या जेरबंद करण्यात यश आले असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे….
महापालिकेचे रणशिंग फुंकले! १५ जानेवारीला मतदान, १६ ला निकाल
मुंबई , दि. १५ डिसेंबर – अखेर बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला. राज्य निवडणूक आयोगाची बहुप्रतिक्षित पत्रकार परिषद आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या…
धक्कादायक ! कोरेगाव भीमा येथे भरधाव वॅग्नर कारची उभ्या ट्रकला भीषण धडक; ५९ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू
कोरेगाव भीमा (ता. शिरूर), दि. १५ डिसेंबर २०२५, अहमदनगर–पुणे महामार्गावर सोमवारी पहाटे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला.वाडा पुनर्वसन फाट्याजवळ फर्ची ओढ्याजवळ जवळ भरधाव वेगात असलेल्या वॅग्नर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात ५९ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पती रामचंद्र दाभाडे गंभीर जखमी झाले…
दहा वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे केले काम… आम्ही पै. किरण साकोरे यांच्या पाठीशी ठाम
भरतवाडी (ता. हवेली) येथील शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न मागील दहा वर्षांपासून प्रलंबित होता याबाबत नागरिकांनी पैलवान किरण साकोरे यांच्याशी संवाद साधला असता काही तासांमध्येच कामाला सुरुवात करण्यात आली व शेतकऱ्यांनी किरण साकोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला त्याचबरोबर आगामी काळात तुमच्या सोबत असल्याचा शब्द दिला यावेळी शेतकऱ्यांनी दहा वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे केले काम म्हणूनच आम्ही पैलवान किरण…
सुरेखा रमेश हरगुडे व संतोष हरगुडे (एस पी) यांच्या तिसऱ्या काशी-अयोध्या देवदर्शन यात्रेला भाविकांचा उदंड प्रतिसाद
केसनंद (ता. हवेली): सुरेखा रमेश हरगुडे व संतोष पांडुरंग हरगुडे (एस.पी.) यांच्या संकल्पनेतून तसेच रमेश बापू हरगुडे मित्र परिवार, केसनंद ग्रामविकास प्रतिष्ठान आणि मिलिंद नाना हरगुडे मित्र परिवार यांच्या नियोजनातून आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या काशी–अयोध्या देवदर्शन यात्रेला केसनंद–कोरेगाव मूळ गटातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवार, दि. १३ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता ही विशेष रेल्वे…
शोध पत्रकारिता वाढवत पत्रकारांनी निर्भीडपणे सत्य समाजापुढे मांडावे – मधुसूदन कुलथे
वाघोली येथे राज्य मराठी पत्रकार परिषदेची वार्षिक आढावा बैठक,दिनदर्शिका २०२६ नियोजन,नवनियुक्त पदाधिकारी,सदस्य निवड समारंभास पत्रकारांचा प्रतिसाद वाघोली (ता. हवेली), दि. १३ डिसेंबर २०२५ पत्रकारांनी पत्रकारितेची प्रतिष्ठा जपत शोध पत्रकारिता वाढवावी आणि कोणताही दबाव न घेता निर्भीडपणे सत्य समाजासमोर मांडावे, असे आवाहन राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी केले. वाघोली येथील वृंदावन…
सुरेखा रमेश हरगुडे व संतोष (एस पी) हरगुडे यांच्या काशी अयोध्या देवदर्शन यात्रेच्या तिसऱ्या रेल्वेचे शनिवार १३ डिसेंबरला होणार भव्य प्रस्थान
केसनंद कोरेगाव जिल्हा परिषद मूळ गटातील जनतेचा भरभरून आशीर्वाद केसनंद (ता. हवेली) सुरेखा रमेश हरगुडे व संतोष पांडुरंग हरगुडे (एस. पी) यांच्या संकल्पनेतून रमेश बापू हरगुडे मित्र परिवार, केसनंद ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या नियोजनातून आयोजित काशी–अयोध्या तिसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद–कोरेगाव मूळ गटातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शनिवार दिनांक १३ डिसेंबर रोजी हडपसर रेल्वे स्थानकावरून भव्य…
प्रदिप दादांची अचूक निवड! पै. किरण साकोरे यांच्याकडून बुर्केगाव-वाडे बोल्हाई शिवरस्त्याचे मुरुमीकरण
आश्वासनांचा पाऊस नव्हे, कामाचा धडाका; शब्दाला जागणारा, हाकेला धावणारा आपला हक्काचा माणूस म्हणून किरण साकोरेंना जनतेचा पाठिंबा बुर्केगाव (ता.हवेली): पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांनी लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटासाठी पैलवान किरण साकोरे यांची निवड करून आपल्या दूरदृष्टीची व अचूकतेची प्रचिती दिली आहे. प्रदीप कंद यांचा विश्वास सार्थ ठरवत, पै. किरण साकोरे यांनी…
अपंग व्यक्तींना कायम सन्मान मिळाला पाहिजे – लुसी कुरियन
प्रतिनिधी पत्रकार राजाराम गायकवाड शिक्रापूर (प्रतिनिधी): दिव्यांग बांधवांना केवळ जागतिक अपंग दिनासारख्या एकाच दिवशी मान-सन्मान न मिळता, तो कायमस्वरूपी मिळाला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण मत ‘माहेर’ संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांनी व्यक्त केले. शिक्रापूर येथील भैरवनाथ मंदिरात जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लुसी कुरियन यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, समाजाने दिव्यांग व्यक्तींना…
