Category: स्थानिक वार्ता
“दूरदृष्टी, संघर्ष आणि यश” – सरपंच संदीप ढेरंगे यांनी लिहिली कोरेगावच्या जलक्रांतीची नवी गाथा!
कोरेगाव भिमा पाणी योजनेला अखेर चालना, ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – “आमची एकी, आणखी बरेच काम बाकी” या कृतीशील विचाराने प्रेरित होऊन आदर्श सरपंच संदीप ढेरंगे व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी कोरेगाव भिमा गावाच्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर निर्णायक मार्ग काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत वनविभागाची कोट्यावधी…
पत्नीवर वार करत नवऱ्याने घेतली फाशी …पोलिस तपासात उघड
मांजरी खुर्द (ता.हवेली)येथील वारुळे दाम्पत्य आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासात नवीन माहिती समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या करून स्वतः हा आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मृत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी राहत्या घरात नागनाथ वारुळे (वय ४२) हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्याची पत्नी उज्वला (वय ४०) ही बाजूला बेडवर…
चाकणला नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अत्याचार
मेदनकरवाडी (ता.खेड) चाकण पोलिस स्टेशन परिसरात एक खळबळजनक व संतापजनक घटना समोर आली आहे. चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (१३ मे) ला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चाकण परिसरातील मेदनकरवाडी येथे घडली असून आरोपीला पोलिसांनी आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित…
न्यु टाईम्स इंटरनॅशनल स्कुल व श्रीमती सुभद्राबाई भुमकर ज्युनिअर कॉलेजच्या नेत्रदीपक निकालाची परंपरा कायम
मागील ८ वर्षांपासून श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भुमकर ज्युनिअर कॉलेजची १००% निकालाची परंपरा कायम लोणीकंद (ता. हवेली) न्यु टाईम्स इंटरनॅशनल स्कुल व श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भुमकर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले असून अनेक विद्यार्थी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त टक्के मिळाले असून दहावीतील चिन्मय जाडे या विद्यार्थ्याने ९७%गुण तर बारावीतील बारावीमध्ये सुनोवा डे या विद्यार्थ्यांचा ९६% गुण…
चाकणला नाकाबंदीवेळी ट्रकने पोलिसाला चिरडले; वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू
चाकण (ता. खेड) मुंबई-पुणे महामार्गावर चाकण फाट्याजवळ मंगळवारी रात्री नाकाबंदीवेळी ट्रकने पोलिसाला चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.मिथून धेंडे (वय ४१, रा. उरुळी कांचन, पुणे) हे वडगाव मावळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास एचआर-७४ बी-३६७७ क्रमांकाच्या ट्रकने त्यांना चिरडले. गाडी बंद केल्यानंतर ट्रक चालकाने गाडी पुन्हा सुरु करून ट्रक पळवत धेंडे यांच्यावर चढवला.त्यात…
धक्कादायक! मांजरी खुर्द येथे फळविक्रेत्या दांपत्याची आत्महत्या
मांजरी खुर्द (ता.हवेली) – पुण्यातील वाघोली जवळील मांजरी खुर्द येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नागनाथ वारुळे (वय ४३) आणि त्यांची पत्नी उज्वला वारुळे (वय ४०) या फळविक्रेत्या दांपत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटना रविवारी (११ मे) रात्री घडली असून सोमवारी (१२ मे) सकाळी उघडकीस आली. प्राथमिक…
शिक्रापूरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर विजय रॅलीद्वारे भारतीय लष्कराला सलाम
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेनंतर ग्रामस्थांनी भव्य विजय रॅलीचे आयोजन करून लष्कराच्या पराक्रमाला सलाम केला. या रॅलीत शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करून…
शिरूर तालुक्यात जेवायला वाढले नाही म्हणून सासऱ्याची सुनेला काठीने मारहाण
शिरूर तालुक्यातील गुनाट गावात एका सासऱ्याने आपल्या सुनेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मंगल बाळू बुलाखे (वय ४५) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मंगल या घराच्या ओट्यावर जेवण करत असताना त्यांचे सासरे नामदेव यशवंत बुलाखे हे दारूच्या नशेत घरी आले. त्यांनी मंगल यांना जेवण वाढण्यास सांगितले. त्यावेळी मंगल यांनी “थांबा, मी…
महाराष्ट्र दिनानिमित्त शिक्रापूर येथे स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूरच्या विद्यार्थ्यांचा एम. पी. एस. सी परीक्षेत यशस्वी डंका शिक्रापूर (ता.शिरूर) दिनांक १मे – विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूर येथे आज एम पी एस सी परीक्षेत विविध पदांवर नियुक्त झालेल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत…
भारतीय जैन संघटना विद्यालय गुणवत्तेत जिल्ह्यात अव्वल
वाघोली, ता. २४: पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाने १००० पेक्षा अधिक विद्यार्थी गटामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून आपले गुणवत्ता नेतृत्व सिद्ध केले आहे. या अभियानात संपूर्ण जिल्ह्यातील तब्बल १५०० शाळांनी सहभाग घेतला होता. शाळांच्या भौतिक सुविधा,…
